श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात भगवान शिवाची पुजा केली जाते. सोमवारी शिवाचे जलाभिषेक, रुदाभिषेक इत्यादीही केले जाते. असे मानले जाते की श्रावण महिन्यात भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्यास खूप शुभ फळ मिळते. याशिवाय श्रावण सोमवारला शिवलिंगासमोर दिवा लावण्याचेही विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकरासमोर दिवा लावणे शुभ असते अशी धार्मिक मान्यता आहे.
लिंग पुराणामध्ये शिवलिंगासमोर दिवा लावण्याचे महत्त्व आणि त्याचे फायदे सांगितले आहेत. लिंग पुराणानुसार, जे भक्त श्रावण महिन्यात (Shravan 2022) शिवलिंगासमोर दिवा लावतात, त्यांना शुभ फळ मिळते. तसेच शिवाचा आशीर्वाद घ्यावा. तुम्ही श्रावणमध्ये शिवलिंगासमोर शुद्ध तुपाचा दिवाही लावू शकता. यासाठी श्रावण सोमवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी शिवलिंगाचा जलाभिषेक केल्यानंतर शिवमंत्रांनी भोलेनाथाची पूजा करावी. यानंतर शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर भोलेनाथाची आरती करावी.
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण व्यतिरिक्त कार्तिक महिन्यातही शिवमंदिरात दिवा लावणे शुभ असते. कार्तिक महिन्यात शिवमंदिरात भोलानाथासमोर दिवा लावणाऱ्या भक्तांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होते, असे म्हणतात. याशिवाय जे भाविक रुद्र गायत्री किंवा शिव पंचाक्षरी मंत्राने पूजा करतात ते शिवलिंगाला स्नान घालून पूजा करतात. यासोबतच दक्षिण भागात ओम आणि विष्णूच्या माध्यमातून ब्रह्मदेवाची पूजा गायत्री मंत्राने केली जाते. ते शिवलोक प्राप्त करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.