Instagram  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Instagram वर येणार 'हे' 4 भन्नाट फिचर, "या" गोष्टींचा कधीही पडणार नाही विसर...

इंस्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवे फिचर लाँच केले आहे.

Puja Bonkile

Instagram Few Feature: फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम आपल्या यूजर्ससाठी नवनवे फिचर लाँच करत असते. पुन्हा एकदा इंस्टाग्राम लवकरच असे 4 फीचर्स लाँच करणार आहे. यात सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्स, बर्थडे फिचर आणि स्टोरीजसाठी मल्टीपल लिस्ट समाविष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया या फिचपबद्दल अधिक माहिती.

बर्थडे फीचर

इस्टाग्रामवर वाढदिवसाचे सेलिब्रेशन अधिक चांगले करण्यासाठी, इंस्टाग्राम बर्थडे फीचर लाँच करणार आहे. जे यूजर्सला त्यांच्या फॉलोअर्सच्या वाढदिवसाविषयी अपडेट देईल आणि त्यांना लोकांसोबत स्टिकर्स अपडेट करण्याची परवानगी देईल.

सेल्फी व्हिडिओ आणि ऑडिओ नोट्स

एका अहवालानुसार, नोट्स हे संपर्काचे लोकप्रिय साधन आहे. तरुणांमध्ये ते खूप लोकप्रिय आहे. यामध्ये यूजर्स एकमेकांसोबत अपडेट सहज शेअर करू शकतील. DM सोबत, ही एक सेवा देखील आहे, ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या मित्रांशी बोलू शकतात.

हा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी इंस्टाग्रामने ऑडिओ आणि सेल्फी व्हिडिओ नोट्सची घोषणा केली आहे. नावाप्रमाणेच, ऑडिओ नोट्स अंतर्गत, वापरकर्ते ऑडिओ रेकॉर्डिंग नोट्स म्हणून सोडण्यास सक्षम असतील. दुसरीकडे, सेल्फी व्हिडिओ नोट्स सेवा यूजर्सना नोट्समध्ये व्हिडिओ बनविण्यास अनुमती देईल. त्यांची मर्यादा 24 तासांपर्यंत असेल.

स्टोरीजसाठी मल्टीपल लिस्ट

या नवीन सेवेअंतर्गत, यूजर्सं एकापेक्षा जास्त लिस्ट तयार करू शकणार आहेत. हे फक्त जवळच्या मित्रांपुरते मर्यादित राहणार नाही. याव्यतिरिक्त, जे वापरकर्ते तुमचे स्टोरीज पाहतात त्यांना अधिक नियंत्रणासाठी मित्रांना गटांपासून वेगळे करण्याचा पर्याय दिला जाईल. Instagram ने म्हटले आहे की ते लवकरच या फिचरची चाचणी सुरू करणार आहे आणि लवकरच ते सर्व यूजर्साठी उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pooja Naik Job Scam: 'ती स्वत:ला वाचवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेतेय'; पूजा नाईक प्रकरणात मंत्री ढवळीकर यांचं मोठं विधान

Donald Trump: टॅरिफमुळे अमेरिका बनला जगातील 'सर्वात श्रीमंत देश', डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; म्हणाले, 'प्रत्येक नागरिकाला 2000 डॉलर देणार...'

Crime News: क्रूर पती! 'दृश्यम' चित्रपट पाहिला आणि रचला पत्नीच्या खुनाचा कट; गळा दाबून हत्या, पुरावा मिटवण्यासाठी भयानक कृत्य

Terrorist Attack: दहशतवादी कटाचा पर्दाफाश! डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 जप्त; तपास यंत्रणांची धावपळ

Wasim Akram: "उनको गेंदबाजी करना मतलब एक परीक्षा..." वसीम अक्रमने भारतीय क्रिकेटपटूबाबत केलेलं विधान चर्चेत

SCROLL FOR NEXT