Work From Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

71% टक्के भारतीयांचे भरघोस पगारापेक्षा WHF, हायब्रिड वर्क मॉड्यूलला प्राधान्य

एकीकडे जगभरातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामासाठी ऑफिसमध्ये येण्याची सक्ती करत असताना हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे

Puja Bonkile

Indeed Survey 2023

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर जगभरातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतायला सांगितले असतानाच भारतातील कर्मचारी मात्र आता ऑफिसमध्ये परतण्यास इच्छुक नसल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. Indeed या नोकरीसंदर्भातील वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील चार पैकी तीन कर्मचाऱ्यांनी नोकरी शोधताना फ्लेक्झिबलिटीला प्राधान्य दिले आहे. (Do employees prefer hybrid work?)

भारतात नोकरीच्या शोधात असलेल्या १२०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणात मत नोंदवले. कर्मचारी फ्लेझिबलिटी म्हणजेच वर्क फ्रॉम होमचा पर्याय, ब्रेकचा कालावधी, वैयक्तिक कामासाठी वेळ अशा गोष्टींना प्राधान्य देत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. उत्पादक क्षमतेत झालेली वाढ, वर्क- लाईफ बॅलेन्स या कारणांमुळे कर्मचाऱ्यांचा फ्लेक्झिबलिटीकडे कल वाढत असल्याचे सर्वेक्षणातून दिसते.  

जवळपास ७० टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी शोधताना वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड वर्क मॉड्यूलला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे, त्यापेक्षा कमी म्हणजे ६७% कर्मचाऱ्यांनी पगार, सुविधा, आरोग्य विमा, रजा आणि कार्यालयातील प्रशिक्षण याला प्राधान्य दिले आहे.

एकीकडे जगभरातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामासाठी ऑफिसमध्ये येण्याची सक्ती करत असताना हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतातील मोठी टेक कंपनी टीसीएसने कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत बोलावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. यात महिला वर्गाचे प्रमाण लक्षणीय होते.

६३ टक्के कर्मचाऱ्यांनी हायब्रिड वर्क मॉड्यूलला प्राधान्य दिले आहे. यात आठवड्यातले ठराविक दिवशी वर्क फ्रॉम होमचा पर्याय आणि उर्वरित दिवशी कार्यालयात जाण्याची तयारी दर्शवली. तर दुसरीकडे फक्त ५१ टक्के नियोक्ता म्हणजेच Employers नी सध्या हायब्रिड वर्क मॉड्यूलला प्राधान्य देत असल्याचे सांगितले.

नोकरीसंदर्भातील ऑनलाईन जाहिराती काय सांगतात?

एकीकडे कर्मचाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी हायब्रीड वर्क मॉड्यूल हवे असताना नोकरी देणाऱ्या कंपन्या मात्र फ्लेक्झिबलिटीसंदर्भात अनुकूल नसल्याचे दिसते.

जून महिन्यात Indeed वर नोकरीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या पोस्टपैकी फक्त ६.५ टक्के जॉब पोस्टमध्ये Work From Home किंवा Remote Work या कीवर्डचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa News: पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय; वाचा गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT