Indian Railway Facilities Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Indian Railway Facilities: भारतीय रेल्वेकडून महिलांना मिळतात 'या' खास सुविधा

Facilities For Women: भारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. याच्या मदतीने त्यांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित होतो.

Puja Bonkile

Indian railways provide facilities for women read list

अनेक महिला रेल्वेने प्रवास करत असातात. त्यांची सुरक्षितता आणि प्रवास सुकर करण्यासाठी भारतीय रेल्वे त्यांना अनेक प्रकारच्या सुविधाही दिल्या आहेत.

या सुविधांची माहिती फार कमी लोकांना आहे. माहितीच्या अभावामुळे अनेक महिला त्याचा लाभ घेऊ शकत नाही.चला तर मग जाणून घेऊया रेल्वेने कोणत्या खास सुविधा दिल्या आहेत

सोयीनुसार बर्थ बदलण्याचा अधिकार

जर गरोदर महिलांना चुकून मिडल किंवा अप्पर बर्थ दिला गेला असेल तर त्या ऑन-बोर्ड तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून लोअर बर्थ मागू शकतात. तुमच्या सोयीचा विचार करून बर्थ एक्सचेंज होईल. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज नाही.

तिकिट काउंटरवर सुविधा

महिलांना ऑनलाईन बुकिंग व्यतिरिक्त रेल्वे काउंटरवरून तिकीट काढायला गेल्यावर तिथे महिलांसाठी स्वतंत्र काउंटर बनवण्यात आले आहेत. परंतु, त्या तिकीट काउंटरवर महिलांसाठी स्वतंत्र काउंटर नसले तरी तुम्हाला सर्वसाधारण रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. यासाठी एकाच काउंटरवर महिला सामान्य रांगेपासून वेगळ्या रांगेत उभ्या राहू शकतात.

जेष्ठ महिलांसा खास सुविधा

ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच ४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला प्रवाशांसाठी किंवा गर्भवती महिलांसाठी ट्रेनच्या प्रत्येक डब्यात लोअर बर्थ देण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यानुसार स्लीपर क्लासच्या प्रत्येक डब्यात 6 बर्थ, एसी 3 एसीच्या प्रत्येक डब्यात 4-5 लोअर बर्थ आणि एसी 2 एसी क्लासच्या प्रत्येक डब्यात 3-4 लोअर बर्थ महिलांसाठी राखीव ठेवलेले असतात.

रिजर्व कोच

मेल किंवा एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अनारक्षित श्रेणीतील महिलांसाठी स्वतंत्र डबा राखीव असतो. त्याच वेळी, 150 किमी पर्यंत कमी अंतर कव्हर करणाऱ्या गाड्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबा राखीव असतो. याशिवाय, आवश्यकतेनुसार, भारतीय रेल्वेकडून महिला विशेष गाड्याही चालवल्या जातात. याबाबत अधिक माहितीसाठी आपण रेल्वे कार्यालयातून माहिती घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT