Women's Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Women’s Day 2023: ‘हे’ 4 अधिकार प्रत्येकीला माहिती हवेत!

तुम्हाला महिलांच्या अशा 4 अधिकारांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल प्रत्येक भारतीयाला माहित असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

Rights Of Indian Women: दरवर्षी 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना महिलांचे अधिकार आणि त्यांचे योगदान याबद्दल जागरूक केले जाते. साधारणपणे प्रत्येक महिला जीवनात अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते.

ज्यामध्ये पत्नी आणि आईची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असते. आजही भारतासारख्या देशात बहुतांश महिलांना त्यांच्या आवश्यक अधिकारांची माहित नसतात. महिलांना किंवा बहुसंख्य लोकांना हे देखील माहित नाही की महिलांना रात्री आणि सूर्योदयापूर्वी अटक न करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

हा महत्त्वाचा अधिकार घटनेत नमूद करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला महिलांच्या अशाच 4 अधिकारांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल प्रत्येक भारतीयाला माहित असणे आवश्यक आहे.

  • सूर्योदयापूर्वी अटक न करण्याचा अधिकार

घटनेच्या कलम 46 मधील उपकलम 4 सांगते की सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलेला पोलीस अटक करू शकत नाहीत. जर काही कारणास्तव महिलेला अटक करावी लागली तर अशा स्थितीत दंडाधिकाऱ्याची विशेष परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  • प्रसूती रजेचा अधिकार

एखादी महिला सरकारी असो वा खासगी, तिला बाळाला जन्म दिल्यानंतर 6 महिन्यांच्या रजेचा अधिकार आहे. मातृत्व लाभ कायद्यांतर्गत हा अधिकार नमूद करण्यात आला आहे. या काळात नवीन आईला पूर्ण पगार मिळण्याचा अधिकार आहे.

  • कायदेशीर मदत करण्याचा अधिकार

भारतीय राज्यघटनेत महिलांना मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार देखील देण्यात आला आहे. कोणी गरीब असला तरी त्याला त्याची केस लढण्यासाठी प्रशासन किंवा न्यायालयाकडून मोफत वकील उपलब्ध करून दिला जाईल. विशेषत: लैंगिक शोषणाचा सामना करणाऱ्या महिलांना मोफत कायदेशीर मदतीची सुविधा दिली जाते.

  • नाव लपविण्याचा अधिकार

बलात्कार किंवा लैंगिक शोषणासारख्या जघन्य गुन्ह्यांना बळी पडलेल्या महिलेला तिचे नाव लपविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. महिला कॉन्स्टेबल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच त्यांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT