India Approves Drug Qartemi To Treat Blood Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Blood Cancer: ब्लड कॅन्सर रुग्णांसाठी आनंदाची बातमी! नवीन औषधाला मिळाली मान्यता; जाणून घ्या कोणत्या स्टेजच्या रुग्णांना होणार फायदा

India Approves Drug Qartemi To Treat Blood Cancer: जगभरात गेल्या दशकात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. याचदरम्यान, भारतातील ब्लड कॅन्सरने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

Manish Jadhav

India Approves Drug Qartemi To Treat Blood Cancer: जगभरात गेल्या दशकात कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. याचदरम्यान, भारतातील ब्लड कॅन्सरने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या रुग्णांसाठी एक नवीन औषध मंजूर करण्यात आले आहे. अलिकडेच, बंगळुरुस्थित बायोटेक स्टार्टअप इम्यूनियल थेराप्यूटिक्सने बी-सेल नॉन-हॉजकिन लिम्फोमा (बी-एनएचएल) ने रुग्णांसाठी एक CAR-T सेल थेरपी क्वार्टेमी लाँच केली आहे.

दरम्यान, ही थेरपी ब्लड कॅन्सरने गंभीररित्या ग्रसित असणाऱ्या रुग्णांसाठी आणि पुन्हा बाधित होण्याच्या टप्प्यावर पोहोचलेल्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. इम्युनिलच्या मते, हे औषध भारतात मंजूर झालेले दुसरे CAR-T सेल थेरपी आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने याआगोदर NexCAR19 या स्वदेशी औषधाला मंजूरी दिली. जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IITB) च्या संशोधन संस्थेने इम्युनोअॅक्टने विकसित केले.

Living Drug काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, क्वार्टेमी हे एक Living Drug आहे. हे औषध पूर्णपणे कार्यशील पेशींपासून बनलेले आहे. हे पारंपारिक रासायनिक औषधांपेक्षा वेगळे आहे. हे औषध पेशींपासून बनलेले असल्याने त्याच्यात दीर्घकाळ टिकणारी रोगप्रतिकारक शक्ती आहे.

CAR-T सेल थेरपी कशी काम करते?

हे नवीन औषध सेल थेरपीद्वारे कार्य करते. वैज्ञानिक भाषेत याला CAR-T सेल थेरपी म्हणतात जी एक प्रकारची इम्युनोथेरपी आहे. या थेरपीमध्ये, रुग्णाच्या टी पेशी कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी अनुवांशिकरित्या तयार केल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT