तरुणींमध्ये PCOD चे वाढते प्रमाण  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तरुणींमध्ये PCOD चे वाढते प्रमाण

दैनिक गोमन्तक

आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या आजाराने ग्रासले आहे. तसेच नव नवीन आजारांची भर पडतच आहे. धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत आहोत. शिवाय मानसिक ताण-तणाव हा तर रोजच्या जीवनाचा भाग बनला आहे. विज्ञानाच्या सिद्धांतानुसार 90 टक्के रोग हे मानसिक ताणावामुळे बळावतात. महिलांमध्ये हार्मोन्सचे बदलण्याचे प्रमान वाढले आहे . त्यात प्रामुख्याने थायरॉईड येतो. थायरॉईडच्या समस्येमुळे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी येणे, वजन एकदम वाढणे किंवा एकदम कमी होणे असे असे परिणाम दिसून येतात. थायरॉईड व्यतिरिक्त PCOD (Polycystic Ovarian Disease) हा आजार सामान्यतः आढळून येत आहे. अनियमित मासिकपाळी (Irregular menstruation) हे याचे प्रमुख लक्षण आहे. बऱ्याच वेळा आपण सामान्यबाब म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण ही बाब आता सामान्य राहिली नाही. वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर स्त्री वंध्यत्व येऊ शकते. चला तर मग जाणून घेवूया PCODचा अर्थ आणि त्याची लक्षणे.

PCOD म्हणजे नक्की काय

PCOD मध्ये स्त्रियांच्या अंडाशयात गाठी होतात. याचमुळे स्त्रियांना वेळच्यावेळी स्त्रीबीज तयार होण्यास अडथळे निर्माण होतात. डिंब ग्रंथी मधून एक परिपक्व असे स्त्रीबीज बाहेर पडते. आणि या स्त्रीबीजाचे मिलन शुक्राणूशी झाल्यावर गर्भाची निर्मिती होते व स्त्री गरोदर होते. स्त्रियांची मासिकपाळी ही अनियमित येत असेल तर PCOD ची तपासणी करणे आवश्यक ठरते.

तरूणींमध्ये आजकाल PCOD म्हणजेच Polycystic Ovarian Diseases किंंवा पीसीओएस Polycystic Ovarian Syndrome चे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गर्भधारणेमध्ये दोष निर्माण होतो. त्यावर वेळीच वैद्यकीय उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवता येते. यावर काही नैसर्गिक उपचार देखील आहेत.

PCOD आणि PCOS ची काही प्रमुख लक्षणे

* गर्भधारणा न होणे

* खाण्यानंतर देखील अशक्तपणा

* केस गळणे

* त्वचेवर वांग येणे

* चेहऱ्यावर पुरळ येणे

* अनियमित मासिकपाळी येणे

* चेहऱ्यावर हात-पायावर केसांमध्ये वाढ होणे

* लठ्ठपणा येणे

* मासिकपाळीत तीव्र वेदना होणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT