अनेक वेळा सकाळी नाश्त्यात (Breakfast) काय बनवावे हा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो. सध्या प्रत्येकाला आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी आणि पौष्टिक पदार्थाने (Healthy Food) व्हावी असे वाटते. यामुळे अनेकजण नाश्यात नवनवीन पदार्थ ट्राय करत असतात. तुम्हाला सुद्धा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी नाश्यात काही पौष्टिक खायला द्यायचे असेल तर तुम्ही काश्मिरी पुलाव (Kashmiri Pulao) नक्की ट्राय करू शकता. हा पुलाव चवीला गोड असून आरोग्यदायी (Healthy) असतो. चला तर मग जाणून घेऊया "काश्मिरी पुलाव" बनवण्याची रेसिपी (Kashmiri Pulao Recipe)
साहित्य
तांदूळ - 1 कप
दूध- 1 कप
सुका मेवा - 1/4 कप
क्रीम- 1/4 कप
जिरे- 1/2 चमच
साखर- 1 चमचा
तूप- 1 चमचा
विलायची - 1
तमालपत्र - 1
लवंग दालचीनी - 3 /4
मीठ चवीनुसार- 1
* काश्मिरी पुलाव बनवण्याची रेसिपी
सर्वात पहिले दूधामध्ये क्रीम, साखर पावडर घालून चांगले मिक्स करावे.
नंतर एका पॅनमध्ये तूप टाकावे आणि यात जिरे, दालचिनी, तमालपत्र, लवंग वेलची घाला आणि चांगले भाजून घ्यावे.
यांनातर तांदूळ चांगले स्वच्छ धुवावे आणि पॅनमध्ये टाकावे.
यामध्ये नंतर दुधाचे मिश्रण तांदूळामध्ये टाकावे आणि थोडे पाणी घालावे.
10 ते 15 मिनिटे तांदूळ शिजू द्यावे.
शेवटी तयार झालेल्या पुलावामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून सर्व्ह करावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.