Immunity Power Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Immunity Power: 'ही' 8 लक्षण देतात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याचे सिग्नल

शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असेल तर तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.

Puja Bonkile

निरोगी आणि फिट राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबुत असणे गरजेचे आहे. पण रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर अनेक आजाराला आपण बळी पडू शकतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे की नाही हे कसे ओळखाल जाणून घेऊया.

1) वारंवार ताप येणे

जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल तर समजुन जा की तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे.

2) वारंवार सर्दी आणि खोकला

जर तुम्हाला वारंवार सर्दी आणि खोकला होत असेल तर हे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असण्याचे लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.

3) संसर्गजन्य आजारांना बळी पडणे

जर तुम्हाला संसर्गजन्य आजार लगेच होत असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे. यामुळे तुम्हाला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

4) आजारपणाचे लक्षण लवकर न समजणे

तुमच्या शरीरातील कोणत्याही संसर्गाचे लक्षण लवकर दिसत नसेल तर ते रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्याचे लक्षण असू शकते.

5) त्वचेवर विपरितपणे परिणाम

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. तुमच्या त्वचेवर मुरुम आणि पुरळ दिसू लागतात.

6) थकवा जाणवणे

कोणतेही काम न करता देखील तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल तर हे तुमच्या रोगप्रतिकारशक्ती कमकुवतपणाचे लक्षण असू शकते.

7) वजन कमी होणे

रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असेल तर तुमचे अचानक वजन कमी होऊ शकते.

8) पोटासंबंधित आजार

जर तुम्हाला पोटासंबंधित आजार वारंवार होत असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे असे समजावे.

  • रोगप्रतिकारशक्ती कशी मजबुत करावी

1) सकस आहार

निरोगी आणि सकस आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. यामध्ये फळे, भाज्या, कडधान्य आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा.

2) पुरेशी आणि योग्य झोप

पुरेशी आणि योग्य झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील मदत करते.

3) व्यायाम

नियमितपणे योगा आणि व्यायाम केल्याने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच अनेक आजारांना देखील दूर ठेवते.

4) तणाव

तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्यान करावे. कारण यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.

5) स्वच्छता

स्वच्छतेची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे. तुम्ही शरीर तसेच आजुबाजुचा पिरसर स्वच्छ ठेवल्यास कोणताही संसर्गजन्य आजार होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT