Peanut Allergy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Peanut Allergy: ॲलर्जीपासून स्वत:ला वाचवा!शेंगदाणे खाण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...

शेंगदाणे प्रत्येकासाठी फायदेशीर नसतात.

दैनिक गोमन्तक

Peanut Allergy: भारतात, शेंगदाणे सर्रास खाल्ले जातात. शेंगदाण्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण शेंगदाणे प्रत्येकासाठी फायदेशीर नसतात. कारण काही लोकांना शेंगदाण्यांची ॲलर्जी असते. या समस्या फारशा गंभीर नसतात, त्यामुळे लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.

याला सामान्यतः पीनट ऍलर्जी असे म्हणतात, ज्यामध्ये इतर ॲलर्जीसारखी लक्षणे असतात. अशा परिस्थितीत तुमच्यासाठी याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हालाही शेंगदाण्याची ॲलर्जी असेल तर वेळीच माहिती घेऊन तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला त्याच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवू शकता.

पीनट ऍलर्जी म्हणजे काय?

जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, “ऍलर्जी हा रोगांशी लढण्याच्या माणसाच्या क्षमतेशी म्हणजेच प्रतिकारशक्तीशी संबंधित आहे. काही लोकांना शेंगदाण्यापासून ॲलर्जी असते, तर प्रत्यक्षात त्यांच्या ऍलर्जीचे कारण म्हणजे शेंगदाण्यात आढळणारे प्रोटीन ऍन्टीजन.

शेंगदाणे खाल्ल्याने, स्पर्श केल्याने अनेकांना ॲलर्जीहोते. शेंगदाणा ॲलर्जीची काही लक्षणे दिसू लागतात, जसे की जिभेला खाज सुटणे, तोंड लाल होणे, संपूर्ण शरीरावर खाज येणे आणि पोट खराब होणे. तसेच, जर तुम्हाला एक्जिमा असेल तर तुम्हाला ॲलर्जी होण्याची शक्यता आहे.

याची लक्षणे काय आहेत?

ऍनाफिलेक्सिस हे शेंगदाणा ॲलर्जी च्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. याचा एकाच वेळी शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो.

शेंगदाणा ऍलर्जीची चिन्हे

1. घशात सूज येणे ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

2. चक्कर येणे

3. रक्तदाबात लक्षणीय घट होते

4. नाडी दरात जलद वाढ

काय समस्या असू शकतात

1. घशात खवखवणे

2. धाप लागणे

3. नाक वाहणे

4. तोंड आणि घशात खाज सुटणे

5. चेहऱ्यावर पुरळ उठणे.

अशा परिस्थितीत काय करावे?

शेंगदाण्याची ॲलर्जी टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शेंगदाणे खाणे टाळणे. याचा अर्थ असा की ज्यात शेंगदाणे आहे ते पदार्थ म्हणून खाऊ नका.

जर तुम्हाला ॲलर्जीची गंभीर लक्षणे जसे की तोंड किंवा घशात सूज येणे किंवा श्वास घेण्यात अडचण येत असेल तर ताबडतोब एपिनेफ्रिन ऑटो-इंजेक्टर वापरा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT