Fenugreek seeds Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fenugreek Seed: केसातील कोंड्याने त्रासलेले असाल तर मेथींच्या बियांचा असा करा वापर

दैनिक गोमन्तक

Fenugreek Seed: आजच्या पीढीला कमी वयात शरीराच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये केसगळती, केस पांढरे होणे, टक्कल पडणे यासोबतच त्वचेवर सुरुकुत्या पडणे अशा अनेक समस्यांचा सामना लहानापासून ते मोठ्यापर्यत सगळ्यांना करावा लागत आहे.

केसगळतीची दिवसेंदिवस मोठी समस्या बनत चालली आहे. अनेकदा डॉक्टरांकडे उपचार घेऊनदेखील ही समस्या कमी होताना दिसत नाही.

अशावेळी पारंपारिक उपाय केले जाऊ शकतात. जास्वदांचे तेल, आवळ्याचे तेल किंवा बदामाचे तेल केसगळती थांबवण्यासाठी उपयोगी पडू शकते. याबरोबरच मेथीच्या बियादेखील आपल्या केसगळती थांबवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात.

मेथीच्या बियांचा उपयोग फक्त केसगळती थांबवण्यासाठीच नाही तर केस पांढरे होण्यापासूनदेखील वाचवू शकते. मेथीचा आपल्या केसाच्या आरोग्यासाठी कसा उपयोग होतो हे पाहणार आहोत. याबरोबरच मेथीचे आपल्या शरीराच्या इतर कोणत्या समस्यावरदेखील फायदेशीर ठरते हेही जाणून घेणार आहोत.

Hair Care Tips

केसांमधील कोंड्याच्या समस्याने अनेकजण ग्रासलेले असतात. कोंड्यामुळे डोक्याला खाज सुटते. डोक्यात सतत कोंडा असेल तर केस गळण्याचे प्रमाण वाढते. कोंड्याचा फक्त केसांवरच नाही तर त्वचेवरही परिणाम होतो.

चेहऱ्यावरचे मुरुम वाढण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही मेथीच्या बियांचा वापर करु शकता. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.

सर्ववयोगटातील स्त्री-पुरुष केसगळतीच्या समस्येने ग्रासलेले आहेत. मेथीदाणे रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजवून ठेवा. सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा. हळू-हळू केस गळणे बंद होईल.

याशिवाय, मेथीचा आरोग्याच्या इतर समस्येवरही उपयोग होतो. जसे की, पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज 5 ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात.

मेथी आणि सुंठ समान प्रमाणात घेऊन पावडर तयार करून घ्या. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल. एक चमचा मेथीदाणे पाण्यासोबत घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते.

मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. सुमारे एक ग्राम मेथीदाण्यांची पावडर आणि सुंठ पावडर यांचे मिश्रण गरम पाण्यातून दिवसभर दोन-तीन वेळा घेतल्याने लाभ होतो.

याबरोबरच, महिलांना गर्भधारणेनंतर मेथी फायदेशीर आहेत. मासिक पाळीच्या काही समस्या असतील तरीसुद्धा मेथी फायदेशीर ठरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT