Street Food Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Street Food In Monsoon: पावसाळ्यात स्ट्रीट फूड म्हणजे आजारांचे माहेरघर

पावसाळ्यात तुम्हालाही स्ट्रीट फूड खाण्याची इच्छा असेल तर काही काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Street Food In Monsoon: पावसाळा सुरू झाला असून अनेक आजार देखील सोबत घेऊन आला आहे. पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. 

अशावेळी सूक्ष्म आणि हानिकारक परजीवी अन्न आणि पाण्याद्वारे शरीरात शिरतात आणि त्यांना आपल्याला आजारी बनवतात. या ऋतूत जिथे लोकांना स्ट्रीट फूडचा आस्वाद घ्यायला आवडतो पण त्यांना हे माहीत नसते की हे स्ट्रीट फूड पावसाळ्यात त्यांच्या आरोग्याचे शत्रू बनते. 

रस्त्यावरील खाद्यपदार्थ उघड्यावर विकले जात असल्याने बुरशी आणि जीवाणू पसरवणारे सूक्ष्म परजीवी त्यांच्याद्वारे शरीरात शिरतात आणि आजारी पाडतात.

  • पावसाळ्यात काही आजार झपाट्याने वाढतात

पावसाळ्यात हवेत भरपूर आर्द्रता असल्याने या ऋतूत जिवाणूंना वाढण्यास आणि पसरण्यास भरपूर संधी मिळते. काचेच्या पेटीत ठेवलेले स्ट्रीट फूड चवदार असते, परंतु त्यावर अनेक प्रकारचे जंतू, बॅक्टेरिया, बुरशी आणि विषाणू चिकटून राहतात.

जे शरीरात जाऊन संसर्ग पसरवतात. हे उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत परंतु ते वेगाने पसरतात. हे जिवाणू शरीरात गेल्यावर विषाणूजन्य ताप, ताप, अपचन, जुलाब, डोळे येणे, टायफॉइड, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारखे आजार लोकांना आपले बळी बनवू शकतात. यादरम्यान त्वचेशी संबंधित आजार देखील होऊ शकतात.

  • रस्त्यावरील खाद्यपदार्थ पावसाळ्यात आजारांना देतात आमंत्रण 

पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य तज्ञांच्या मते उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यात चांगले शिजवलेले अन्न खावे. ज्या पदार्थांवर माशा बसतात ते पदार्थ खाऊ नये.

तसेच स्ट्रीट फूड ताजे आहे की नाही हे तपासणे अवघड असल्याने शक्य असल्यास पावसाळ्यात स्ट्रिट फूड खाणे टाळावे. त्यामुळे पावसाळ्यात ताजे आणि घरगुती पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावे. स्ट्रीट फूड ऐवजी घरच्या घरी योग्य आणि ताजा आहार घेतला तर पावसाळ्यातही तुमचे शरीर आजारांचे माहेरघर बनू शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT