Goa Tourism: लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणाऱ्या गोव्यात समुद्र किनाऱ्यांशिवाय वॉटर पार्क्स देखील प्रसिध्द आहेत. गोवा हे भारतातील सर्वोत्तम वॉटर पार्कचे माहेरघर आहे. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यापासून वेगळ्या ठिकाणी जायचे असल्यास तुम्ही याठीकाणी नक्की भेट देऊ शकता. जाणून घ्या गोव्यातील प्रसिध्द वॉटर पार्क कुठे आहेत आणि कोणते आहेत
1. स्प्लॅशडाउन वॉटर पार्क
स्प्लॅशडाउन वॉटर पार्क, गोव्यातील सर्वोत्कृष्ट वॉटर पार्कपैकी एक आहे. गोव्यातील या वॉटर पार्कमध्ये एक सुंदर रिसॉर्ट आणि सीझन पास देखील आहे.
वेळ: सकाळी 10:30 ते संध्याकाळी 6:00
वेबसाइट: www.splashdowngoa.com
2. फ्रॉगीलँड
फ्रॉगीलँडमध्ये अनेक वॉटर एडवेंचर आहेत. फ्रॉगीलँड हे गोव्यातील सर्वोत्कृष्ट वॉटर पार्कपैकी एक असण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते मध्य गोव्यापासून 20 KM पेक्षा कमी अंतरावर आहे.
वेळ:
मंगळवार - रविवार: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत
पत्ता: पाटेपूर, नुवे, गोवा 403604
वेबसाइट: www.froggylandgoa.com
3. नागेश वॉटर वर्ल्ड
नागेश वॉटर वर्ल्ड, गोव्यातील वॉटरपार्क
नागेश वॉटर वर्ल्डमध्ये, वॉटर राइड्ससह निसर्ग सैंदर्याचा मेळ आहे. या ठिकाणी तुम्ही कॉटेजमध्ये खोल्या बुक करू शकता.
वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00
पत्ता: पास्कोल फार्म जवळ, (नेस्ले फॅक्टरी समोर), तिस्क रोड, फोंडा, खांडेपार, गोवा 403406
वेबसाइट: www.oveforestgoa.com/trip/nagesh-water-world-khandepar-ponda
4. शर्वराज इको फार्म गोवा
गोव्यातील पहिल्या इको फार्ममध्ये मनोरंजन पार्क, अॅडव्हेंचर पार्क आणि वॉटर पार्क देखील आहे. वेगवेगळ्या आकाराच्या पाण्याच्या मोठ्या स्लाइड्स, मानवनिर्मित धबधबा आणि रेन डान्स पार्टीसाठी जागा आहे.
वेळ: सकाळी 09:00 ते संध्याकाळी 05:30
किंमत: केवळ वॉटर पार्कमध्ये प्रवेश - INR 600 प्रति व्यक्ती
पत्ता: पित्रे इस्टेट, म्हापसा, हायवे, कारापूर, साखळी, गोवा 403505
वेबसाइट: www.sharvrajecofarm.in
5. ब्लू व्हेल वॉटर पार्क (कोको हेरिटेज रिसॉर्ट)
वॉटर पार्कमधील सर्वात महत्त्वाचे हॉटस्पॉट म्हणजे फाइंडिंग निमो जंपिंग कॅसल आहे. याठिकाणी तुम्ही तुमची संध्याकाळ डीजे डान्स सोबत घालवू शकता.
वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 06:00
पत्ता: बागा-हडफडे रोड, गोवा बीच क्लब जवळ, हडफडे, गोवा ४०३५१६
वेबसाइट: www.bluewhalegoa.com/FrmCocoHeritage.aspx
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.