Summer Health Tips, Summer Health care Tips, Tips to avoid Dehydration, Hydrating foods for summer
Summer Health Tips, Summer Health care Tips, Tips to avoid Dehydration, Hydrating foods for summer  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात स्ट्रॉबेरीसह 'या' फळांचे करावे भरपूर सेवन

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात आरोग्याची (Health) काळजी घेणे गरजेचे असते. यामुळे आपल्या दैनंदिन आहारकडे लक्ष देणे महत्वाचे असते. कडक उन्हामुळे अनेकांना डिहायड्रेशनची (Dehydration) समस्या उद्भवू शकते. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी (Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेकवेळा केवळ पाणी पिणे पुरेसे नसते तर पाण्याने समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असते. (Summer Health Tips)

* स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये (Strawberries) मुबलक प्रमाणात पाणी असते. त्यात जवळपास ९० टक्के पाणी असते. या फळामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि मॅंगनीज भरपूर प्रमाणात असतात. . हे सर्व पोषक घटक मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित समस्यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत करतात.तसेच उन्हाळ्यात (Summer) हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.

* सफरचंद

सफरचंद मध्ये सुमारे 80 टक्के पाणी असते. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तसेच पचनसंस्था देखील चांगली राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी सफरचंद फायदेशीर असते.

* काकडी

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. मध्ये जवळपास 90 टक्के पाणी आणि पोटॅशियम असते. त्यामुळे उन्हाळ्यात काकडीचे सेवन केल्याने डिहायड्रेशन टाळता येतो. काकडी मेंदूसाठीही फायदेशीर आहे.

* टरबूज

टरबूज उन्हाळ्यात खाणे आरोग्यासाठी फयदेशीर असते. टरबूजमध्ये 90 टक्के पाणी असते. यामुळे शरीरातील पणयांचे प्रमाण नियंत्रित ठेवते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. या फळामुळे हृदयविकार टाळण्यासही मदत होते.

* टोमॅटो

टोमॅटोमध्ये 90 टक्के पाणी असते. टोमॅटोचा वापर आपण सॅलडमध्ये करू शकतो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्यामुळे दृष्टी सुधारते. तसेच टोमॅटोमुळे त्वचा देखील चांगली राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

United Nations: इस्रायलच्या समर्थनार्थ पहिल्यांदाच UN बैठक, अमेरिकेने दिला पूर्ण पाठिंबा; इस्त्रायली लष्कर राफाह शहरात घुसले!

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

SCROLL FOR NEXT