Diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Type 2 Diabetes: महिलांनो सावधान! टाईप 2 मधुमेह वाढवतोय हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय आणि तज्ञांचा सल्ला

Type 2 Diabetes In Women: टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) हा एक 'मेटाबॉलिक डिसऑर्डर' आहे, ज्यामध्ये शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करु शकत नाही किंवा पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही.

Manish Jadhav

Type 2 Diabetes In Women: टाईप 2 मधुमेह हा एक 'मेटाबॉलिक डिसऑर्डर' आहे, ज्यामध्ये शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सातत्याने वाढलेली राहते. महिलांमध्ये ही समस्या विशेषतः हार्मोनल बदलांमुळे, लठ्ठपणामुळे, खराब जीवनशैलीमुळे आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) सारख्या स्थितींमुळे अधिक वाढते. याव्यतिरिक्त, ज्या महिलांना गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) मधुमेह झाला होता, त्यांना भविष्यात टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो.

टाईप 2 मधुमेहाची कारणे आणि शरीरावर होणारे परिणाम

दीर्घकाळ शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव आणि फायबरयुक्त पदार्थांऐवजी प्रक्रिया केलेले (Processed Foods) अन्न जास्त खाणे यामुळेही हा आजार बळावतो. जेव्हा रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहते, तेव्हा त्याचा शरीरातील जवळजवळ सर्व अवयवांवर वाईट परिणाम होतो. मधुमेह किडनी, डोळे, नसा, मेंदू आणि हृदयावर नकारात्मक परिणाम करतो. यामुळे न्यूरोपैथी (नसांवर परिणाम), रेटिनोपैथी (डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम) आणि किडनी निकामी होणे (Kidney Failure) यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

महिलांमध्ये (Women) मधुमेह हार्मोनल असंतुलन वाढवू शकतो, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि गर्भधारणेतही अडचणी येतात. मधुमेहामुळे रोगप्रतिकारशक्ती (Immune System) कमकुवत होते, ज्यामुळे संसर्ग लवकर होतो आणि जखमा भरण्यास जास्त वेळ लागतो.

महिलांमध्ये टाईप 2 मधुमेहामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो

दिल्ली एमसीडीमधील औषध विभागाचे डॉ. अजय कुमार यांच्या मते, टाईप 2 मधुमेह आणि हृदयविकारांचा (Heart Diseases) खूप जवळचा संबंध आहे. मधुमेहामुळे शरीरात रक्तातील साखर वाढण्यासोबतच कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब (Blood Pressure) देखील वाढू शकतो. यामुळे नसांवर फॅट जमा होऊ लागते, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) म्हणतात. ही स्थिती हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा स्ट्रोकचा (Stroke) धोका वाढवते.

तसेच, महिलांमध्ये हा धोका पुरुषांच्या तुलनेत अधिक असतो, कारण हार्मोनल बदल आणि इस्ट्रोजेनचा (Estrogen) प्रभाव मधुमेहामुळे हृदयाच्या कार्यावर अधिक परिणाम करतो. NIHR लेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर (BRC) च्या मते, मधुमेहाने ग्रस्त महिलांमध्ये हृदयविकारांशी संबंधित समस्यांचा धोका पुरुषांच्या तुलनेत 2 ते 3 पट जास्त असतो. म्हणूनच, महिलांनी मधुमेहाला हलक्या घेऊ नये.

मधुमेहापासून बचाव कसा कराल?

मधुमेहापासून बचाव करण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खालील उपाय आवश्यक आहेत.

  • वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करुन घ्या.

  • पौष्टिक आणि कमी साखरेचा आहार घ्या.

  • दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक हालचाली करा.

  • वजन नियंत्रणात ठेवा.

  • योग, ध्यान आणि पुरेशा झोपेने तणाव कमी करा.

  • धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा.

  • नियमित आरोग्य तपासणी करुन कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब तपासत राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT