

पणजी: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नोकरी घोटाळ्यावरून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरून थेट सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. 'सत्ताधारी पक्षाच्या निर्देशानुसार ढवळीकर यांच्यावर राजकीय दबाव आणण्यासाठी त्यांचे नाव या घोटाळ्यात जाणूनबुजून ओढले गेले आहे,' असे सरदेसाई यांनी ठामपणे म्हटले आहे.
सरदेसाई यांनी नोकरी घोटाळ्यातील सहभागी व्यक्तींच्या भाजपसोबतच्या संबंधांवरही बोट ठेवले आहे. "नोकरी घोटाळ्यात सामील असलेले अधिकारी भाजपशी चांगले जोडले गेले आहेत," असा सरदेसाईंचा दावा आहे.
तसेच, या घोटाळ्यात सहभागी असलेले एजंट हे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यामुळे ते भाजपच्या निर्देशानुसार बोलत आहेत, हे स्पष्ट होते, असे सरदेसाई म्हणाले. या आरोपांमागे सुदिन ढवळीकर यांच्यावर राजकीय दबाव टाकण्याचा भाजपचा हेतू स्पष्ट दिसतो, असे सरदेसाई यांनी नमूद केले.
यावेळी विजय सरदेसाई यांनी भाजप आणि मगोप यांच्यातील संबंधांवरही टिप्पणी केली. सरदेसाई म्हणाले, "दोन आमदार असलेल्या आणि सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या मगोपला भाजप आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत केवळ ३ जागा देत असल्याचे मला माहिती आहे."
हा आकडा मगोपसारख्या जुन्या प्रादेशिक पक्षासाठी अन्यायकारक असल्याचे सरदेसाई यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. सरदेसाई यांच्या या थेट आरोपांवर भाजप यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.