Face Pack For Glowing Skin: ग्लोइंग स्किनसाठी महिला अनेक उपाय करत असतात. पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. पण तुम्ही घरीच कॉर्न फ्लोरपासून बनवलेले फेस पॅक लावून तव्चा चमकदार बनवु शकता.
कॉर्न फ्लोअर त्वचेसाठी फायदेशीर असते. त्वचा सॉफ्ट बनवते तसेच उजळ करण्यास मदत करते. कॉर्न फ्लोअरपासून फेस पॅक दोन प्रकारे बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया की ते कसे बनवतात.
तांदळाचे पीठ, दूध आणि कॉर्न फ्लोअर
तांदळाचे पीठ त्वचेवरील डेड स्किन काढण्यास मदत करते. कॉर्न मास्क चेहऱ्यावरील तेल काढून टाकण्यास मदत करते.
पॅक बनवण्यासाठी २ चमचे तांदळाचे पीठ, २चमचे कॉर्न फ्लोअर आणि थोडे दूध घ्यावे. नंतर एका भाड्यांमध्ये तिन्ही गोष्टी मिक्स करावे.
लिंबू, हळद आणि कॉर्न फ्लोअर
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्वचेचे अतिनील किरणांपासून बचाव करण्यासाठी हे पॅक मदत करते.
हा फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला १ टेबलस्पुन कॉर्न फ्लोअर, १ टेबल स्पून लिंबाचा रस, १ टीस्पुन हळद, गुलाबजल घ्यावे. हे सर्व मिश्रण एका भाड्यांत एकत्र मिक्स करावे. चांगली एकजीव पेस्ट तयार करावी.
फेस पॅक लावण्याची पद्धत
फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. नंतर पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने लावावी. १५ ते २० मिनिटे हे पॅक लावून ठेवावे.
एकदा ते कोरडे झाल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. त्यानंतर मऊ टॉवेलने चेहरा स्वच्छ करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.