Cycle of Thoughts Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cycle of Thoughts: आता हे विचारांचं चक्र थांबवायचं कसं?

Health मनात सुरु असलेलं हे विचारचक्र (Cycle of Thoughts) कशा पद्धतीने थांबवायचं

दैनिक गोमन्तक

मागच्या लेखात आपण विचारचक्र म्हणजे काय आणि विचारचक्र आणि त्यामुळे येणारा स्ट्रेस याविषयी जाणून घेतलं. त्यानंतर आता मनात सुरु असलेलं हे विचारचक्र कशा पद्धतीने थांबवायचं ते जाणून घेऊयात. (How to stop the cycle of thoughts)

आता हे विचारांचं चक्र थांबवायचं कसं? आपल्यातील प्रत्येकाला हा प्रश्न आहेच आणि त्याची नितांत गरजदेखील आहे. विचारांना विचार थांबवू शकत नाहीत. विचारांवर एकच शस्त्र आहे ते म्हणजे शांतता. शांत बसणं इतकं सोपं असतं तर प्रश्नच मिटला असता! या शांततेची प्रॅक्टिस योग सरावात होत असते. नियमित योगसाधना दोन विचारांमध्ये पॉज निर्माण करायला शिकवते. हा पॉज आपल्याला हळूहळू वाढत न्यायचा आहे. जितकी याची प्रॅक्टिस होईल तितकी मनाला सवय लागत जाते आणि हळूहळू मनाची ठेवण बनते.

अशी सवय विकसित झाल्यावर एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर माकड उड्या मारतं, तसं मन एका विचारावरून दुसऱ्या विचाराकडं धावणार नाही. त्याला थांबायची सवय लागेल. मग बाहेरून उत्तेजन आलं, तरी विचारांचा गदारोळ न होता ‘थांबा, पाहा, पुढे जा’ असे आपोआप व्हायला लागेल. कारण अगोदरच विचारांनी थकलेल्या मनाला या शांत बसण्यानं विश्रांती मिळेल आणि मग ते मन अशी विश्रांती कशी मिळेल यासाठी योगद्वारे प्रयत्न करू लागेल. विचारांना थांबवायचं कसं हे शास्त्र आपल्याला योग शिकवतो, ते समजलं आणि विकसित केलं, की मग तेच विचार कधी थांबवायचे ही कला आपोआप आत्मसात होत जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT