Electricity Saving Tips Dainik gomantak
लाइफस्टाइल

उन्हाळ्यात वीज बिल कसे कमी करावे?

या महागाईच्या जमान्यात जनता अगोदरच नाराज झाली आहे. त्याच लोडशेडींगचाही त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

दैनिक गोमन्तक

वीज बिल कसे कमी करावे: उन्हाळा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या घरात एसी आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. एसी आणि कुलर जास्त चालत असल्याने अचानक वीज बिलात वाढ होत आहे. या महागाईच्या जमान्यात जनता अगोदरच नाराज झाली आहे. त्याच लोडशेडींगचाही त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. जर तुम्हीही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे हैराण असाल, तर आम्ही दिलेल्या काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही वीज बिल कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या मार्गांनी तुम्ही वीज बिल 50% टक्क्यांनी कमी करू शकता. (Electricity Saving Tips)

1. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रेटिंग लक्षात ठेवा

स्मार्ट इलेक्ट्रिक प्रकल्पांचा कल देशात झपाट्याने वाढत आहे. आजकाल ग्राहक कोणतेही इलेक्ट्रॉनिक उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याचे रेटिंग तपासतात. या रेटिंगचा अर्थ आहे की तुमचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन किती कमी वीज वापरते. 5 स्टार रेटिंग असलेल्या उत्पादनांद्वारे सर्वात कमी वीज वापर केला जातो. अशा परिस्थितीत, जास्तीत जास्त रेटिंगसह उत्पादने खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

2. या तापमानात एसी चालवा,

जर तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या घराचे वीज बिल कमी करायचे असेल तर 24 डिग्री तापमानावर आपला एसी चालवा. आजच्या काळात विंडो एसी असो की स्प्लिट एसी, बहुतेकांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. 24 डिग्री तापमानात एसी लावूनही आपण दीर्घकाळ कमी वीज वापरून थंड होण्याचा फायदा घेऊ शकता.

3.दिवसा दिवे बंद ठेवा.

दिवसाच्या वेळी जर तुमच्या घरात सुर्यप्रकाश येत असेल तर अशा वेळी दिवे बंद ठेवा. याद्वारे तुम्ही वीज बिलात कपात करू शकता. तसेच घरातील प्रत्येक खोलीत एलईडी बल्ब लावावेत. यामुळे बिलातही सुमारे 50 टक्के कपात होईल. तुम्ही घरात वापरत नसलेली इलेक्ट्रॉनिक उत्पादने बंद करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा धमाका! 'किंग कोहली'ला टाकले मागे; नावावर केला मोठा विक्रम

Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या नेत्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरू! एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू; लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

Morjim: ...तोपर्यंत ‘त्‍या’ स्मशानभूमीचा वापर नको! न्यायालयाचे निर्देश; मोरजी पंचायतीला धक्का

Drugs In Goa: कैद्यांना जर ड्रग्स मिळत असतील, तर बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! गोव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत

SCROLL FOR NEXT