wardrobe  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lifestyle: 'या' स्मार्ट ट्रिक वापरुन सेट करा तुमचं वॉर्डरोब!

सुट्टीच्या दिवशी कपाट झटपट आवरायचे असेल तर ट्राय करा या टिप्स

दैनिक गोमन्तक

Lifestyle: प्रत्येकजण कपडे ठेवण्यासाठी वॉर्डरोबचा वापर करतात. पण अनेकदा हे वॉर्डरोब सेट करता येत नाहीत किंवा सेट जरी केले तरी पुन्हा जैथे थे होते.

अशावेळी काही खास पद्धतींच्या मदतीने वॉर्डरोब नीट करून तुम्ही काही मिनिटांत ते पूर्णपणे सेट करू शकता. बरेचदा लोक वॉर्डरोबमध्ये कपडे कसेही ठेवतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण वॉर्डरोब खराब होतो.

पण वॉर्डरोब रीसेट करणे हे खूप वेळ घेणारे आणि थकवणारे काम आहे. म्हणूनच वॉर्डरोब सेट करण्यासाठी काही स्मार्ट टिप्स शेअर करणार आहोत.

  • कपडे डिव्हाइड करावे

वॉर्डरोबमध्ये कपडे व्यवस्थित ठेवण्यासाठी कपड्यांचे विभाग डिव्हाइड करू शकता. दररोजचे कपडे एका कप्यात ठेवा आणि ऑफिस वेअर आणि पार्टी वेअर कपडे वेगळ्या कप्यात ठेवा. यामुळे तुमचा वॉर्डरोब परफेक्ट पद्धतीने व्यवस्थित होईल.

  • स्टोरेज टिप्स

वॉर्डरोबमध्ये कपडे घालताना जीन्स व्यवस्थित फोल्ड करून ठेवा. तुम्ही टी-शर्ट, पायजामा आणि वर्कआउटचे कपडे गुंडाळून ठेवू शकता. तसेच हँगरमध्ये कपडे लटकवताना कलर कोड फॉलो करा आणि एकाच रंगाचे कपडे हॅंगरमध्ये एकत्र टांगू शकता. त्यामध्ये, तुम्ही हँकी, मोजे आणि अंडरगारमेंट्स ड्रॉवर डिव्हायडरमध्ये ठेवू शकता.

  • गोष्टी ऑर्गेनाइज करा

वॉर्डरोब सेट करताना महत्त्वाच्या गोष्टी समोर ठेवा. त्याच वेळी, कमी वापरलेले कपडे मागे ठेवा. यामुळे तुम्हाला वस्तू शोधण्यात फारशी अडचण येणार नाही. तसेच तुमचा वॉर्डरोब खराब होणार नाही.

  • सगळं सामान बाहेर काढा

वॉर्डरोब सेट करण्यासाठी आधी त्यात ठेवलेले सर्व सामान बाहेर काढा. त्याच वेळी, थोड्या वेळात वॉर्डरोब सेट करण्यासाठी प्रत्येक कॅबिनेट रिकामे करा. यामुळे तुमच्यासाठी गोष्टी ठेवणे सोपे होईल.

  • फक्त गरजेच्या वस्तु ठेवा

अनेक वेळा वॉर्डरोबमध्ये अनावश्यक गोष्टीही भरलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला रोजच्या वापरातील वस्तू बाहेर काढण्यात त्रास होऊ शकतो.

तुम्ही जे कपडे घालत नाहीत ते कपडे वॉर्डरोबमधून काढून गरजूंना द्या. हिवाळ्यातील कपडे बॅगमध्ये पॅक करा आणि स्टोअर रूममध्ये ठेवा. यामुळे तुमचा वॉर्डरोब मोकळा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ब्रिटिशांच्या पक्षाने देशभक्ती शिकवू नये!', BJYM अध्यक्षांनी काँग्रेसला सुनावलं; Watch Video

Goa Rain: मान्सून म्हणतोय,"राम राम"! गोव्यात पावसाचा जोर घटला; ऑक्टोबर हीटची चाहूल

Charter Flight: पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात! रशियातून पहिले चार्टर विमान मोपा विमानतळावर दाखल; गोव्याचे पारंपरिक आदरातिथ्य

Bethora Road Issue: बेतोड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Goa Politics: खरी कुजबुज, मायकल जागे झाले!

SCROLL FOR NEXT