Panchamrut  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Panchamrut Recipe: असे बनवा पारंपारीक पद्धतीचे पंचामृत

Panchamrut Recipe: या पाच पदार्थांपासून पंचामृत बनवले जाते.

दैनिक गोमन्तक

घरोघरी सणासुदीला आणि वेगवेगळ्या पूजेच्या वेळी पंचामृत बनवले जाते. पूजेच्या दरम्यान देवाला पंचामृताचा नैवेद्य दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिले जाते. कोणतीही पूजा पंचामृताशिवाय अपूर्ण मानली जाते. पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृतांचे मिश्रण.

पंच म्हणजे पाच आणि अमृत म्हणजे अमरत्व प्राप्त करण्याचे जल किंवा शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी प्यावयाचे द्रव्य. गायीचे दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच पदार्थांपासून पंचामृत बनवले जाते. यातील प्रत्येक पदार्थ किती प्रमाणात घ्यायचा; तसेच ते पदार्थ कोणत्या क्रमाने एकत्र करायचे यामागे एक शास्त्र आहे.

पंचामृतात वापरल्या जाणाऱ्या या पाचही पदार्थांना स्वतःचे महत्त्व आहे. दूध शुद्धता आणि पवित्रता दर्शवते. तूप शक्ती आणि विजयासाठी असते, मध समर्पण आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे. साखर आनंद आणि गोडवा आहे, तर दही हे समृद्धीचे प्रतीक आहे.

साहित्य: 4 चमचे दही, 2 चमचे तूप, 1 मोठी वाटी दूध, 1 चमचा साखर आणि 1 चमचा मध

कृती: भांड्यात दही घालून ते चांगले फेटून घ्यावे. त्यात तूप, साखर व मध घालावा व शेवटी दूध घालून सारखे करावे. काही ठिकाणी तयार पंचामृतात तुळशीचे पान घालतात.

पंचामृत करायला अगदी सोपे वाटले, तरी ते करताना काही गोष्टी पाळाव्या लागतात. मुख्य म्हणजे त्यातले पदार्थ ताजे असावेत व दही गोड असावे. पंचामृतातले दही काही वेळाने आंबट होते व त्याचा वासदेखील बदलतो, त्यामुळे ते तयार केल्यावर जास्त वेळ ठेवू नये. आयुर्वेदानुसार तूप आणि मधाचे प्रमाण सारखे नसावे. पंचामृत नेहमी चांदीच्या, काचेच्या किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात बनवावे.

पंचामृत प्रसाद म्हणून नाही, तर दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास त्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. त्याच्या सेवनाने बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्ती वाढते; तसेच त्वचा निरोगी राहते. पंचामृत पित्तशामक असून, ते शरीरातील पिताला संतुलित ठेवते. त्याचे सेवन पचनक्रियेसाठी उत्तम ठरते.

पंचामृत हा दक्षिण भारतातील एक लोकप्रिय प्रसाद आहे. तिथे मूळ पंचामृतात गणपतीसमोर म्हणून ठेवलेल्या केळी, आंबा किंवा सफरचंदाच्या लहान फोडी घातल्या जातात. फळांच्या जोडीने केशर आणि सुकामेवा घातलेले खिरीसारखे पंचामृत प्रसाद म्हणून दिले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

Congress: काँग्रेसच्या यशात 'संविधान वाचवा'चा वाटा, पण डॉ. आंबेडकरांशी असलेले तणावपूर्ण संबंध विसरता येईल का?

Tesla Showroom In Mumbai: इलॉन मस्कच्या 'टेस्ला' कंपनीचं मुंबईत जय महाराष्ट्र! वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातलं पहिलं शो रूम सुरू

Comunidade Land: कोमुनिदाद जमिनी लाटू नका! अन्यथा गावकारी संपेल, भूमिपुत्र संपतील, पर्यायाने गोंयकारांसह गोवाही संपेल...

School Bag: दप्तराच्या ओझ्याखाली दबलेला विद्यार्थी 'प्रसन्न' नसेल तर त्याला अभ्यास कसा पेलवेल?

SCROLL FOR NEXT