Homemade Holi Colors Dainik Gomantak
लाइफस्टाइल

DIY Natural Holi Colors: किचनमधील 'या' गोष्टींचा वापर करून बनवा नैसर्गिक रंग

How To Make Natural Holi Colors at Home Know in Marathi: बाजारात अनेक केमिकल असलेले रंग मिळतात. ज्यामुळे त्वचा, केस आरोग्याला हानी पोहोचवू शकते. अशावेळी तुम्ही किचनमधील काही साहित्याचा वापर करून घरीच नैसर्गिक रंग तयार करू शकता.

Puja Bonkile

Homemade Natural Colours For Holi With Kitchen Ingredients

रंगांचा सण म्हणजे होळी. या दिवशी एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. यंदा होळी 25 मार्चला सारजी केली जाणार आहे. बाजारात अनेक केमिकल असलेले रंग मिळतात. ज्यामुळे त्वचा, केस आरोग्याला हानी पोहोचवू शकते. अशावेळी तुम्ही किचनमधील काही साहित्याचा वापर करून घरीच नैसर्गिक रंग तयार करू शकता. होळीसाठी नैसर्गिक रंग कसे बनवायचे हे जाणून घेऊया.

  • केशरी रंग

होळीसाठी केशरी रंग बनवण्यासाठी वाळलेल्या संत्र्याचा वापर करावा. यासाठी संत्र्याची वाळलेली साल मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावी. नंतर त्यात कॉर्न फ्लोअर आणि थोडी हळद मिक्स करावी. नंतर चाळणीने गाळून घ्या. तयार आहे तुमचा केशरी रंग. या रंगामुळे आरोग्याला कोणताही धोका होणार नाही.

  • हिरवा रंग

पुदिना आणि पालक सारख्या पालेभाज्यांचा वापर करून हा साधा रंग बनवता येतो. पानं स्वच्छ धुवून बारीक करून घ्यावी नंतर पेस्ट चाळणीने गाळून घ्यावी. नंतर एका मोठ्या ट्रेमध्ये गुलाबजल मिक्स करा आणि एक कप कॉर्न फ्लोअर मिक्स करा. ते हाताने चांगले मिक्स करा आणि त्यातील गुठळ्या कमी करा. उन्हात कोरजे करायला ठेवा.

  • गुलाबी रंग

घरी छान गुलाबी रंग बनवण्यासाठी १-२ मध्यम आकाराचे बीट घ्यावे. ते बारिक किसून घ्यावे आणि किसलेले बीट १ कप पाण्यात मिक्स करावे. नंतर गाळणीचा वापर करून, बीटचा रस पिळून घ्या आणि त्यात 1 चमचे गुलाबजल मिक्स करा. दरम्यान, हे सर्व नैसर्गिक ठेवण्यासाठी, कोणीही कॉर्न फ्लोअर वापरू शकतो नाहीतर कोणत्याही टॅल्कम पावडरचा वापर हा घरगुती रंग बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. 3 कप कॉर्न फ्लोअर रसात मिक्स करा. पावडर सूर्यप्रकाशात कोरडे होऊ द्या किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून कोरडे करा. तुमचा नैसर्गिक गुलाबी रंग तयार आहे.

  • लाल रंग

घरी लाल रंग बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या पाण्यात एक तास भिजत ठेवा आणि नंतर बारीक करा. त्यात कॉर्नफ्लोअर घालून नीट मिक्स करून गुळगुळीत पावडर बनवून घ्या. पावडर उन्हात वाळवा किंवा मायक्रोवेव्ह करा. तुमचा लाल रंग तयार आहे.

  • पिवळा रंग

होळीसाठी नैसर्गिक रंग बनवण्यासाठी फक्त 1 कप पाणी घ्या, ते उकळवा आणि 2 चमचे हळद घाला. मिश्रण उकळून एका मोठ्या ट्रेमध्ये टाका आणि थंड होऊ द्या. मिश्रण खोलीच्या तपमानावर आल्यावर, 2 चमचे गुलाबजल घाला आणि 3 कप कॉर्नफ्लोर घाला. ते चांगले मिक्स करा आणि गुठळ्या फोडून घ्या. एकदा बारीक करून उन्हात वाळवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP Poster War: रुमडामळमध्‍ये 'पोस्टर वॉर', भाजपचे दोन गट भिडले! पोलिसांना मध्यस्थी करून वाद मिटवला

Goa Politics: कामत, तवडकर बिनखात्याचेच; पाच दिवस उलटले, खाते वाटपास आणखी विलंब शक्य‍

Court Verdict: 4.52 कोटींच्या वीज घोटाळा प्रकरणी माविन गुदिन्हो दोषमुक्‍त, पर्रीकरांनी केले होते आरोप; तब्‍बल 27 वर्षानंतर निकाल

Rashi Bhavishya 26 August 2025: मनातील गोंधळ कमी होईल, महत्त्वाच्या कामांना गती मिळेल; वाचा तुमच्या राशीचं भविष्य

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

SCROLL FOR NEXT