Holi 2024: होळी खेळण्यापूर्वी अशी करावी तयारी, अन्यथा...

Holi 2024: तुम्ही होळी खेळण्यापूर्वी कोणती तयारी करावी हे जाणून घेऊया.
Holi Special:
Holi Special:Dainik Gomantak
Published on
Updated on

holi 2024 celebration safety tips how to play safe holi

देशभरात होळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि रंग लावण्यासाठी लोक एकमेकांच्या घरी जातात. या दिवशी रंग हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, पण कधी कधी आनंद पसरवणारा हा रंग थोड्याशा निष्काळजीपणामुळे सणाचा रंग बिघडवतो.

आजकाल बाजारात रासायनिक मिळतात. होळी खेळताना त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्ही होळी खेळण्यापूर्वी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यामुळे त्वचा, डोळे आणि केस यांना हानी पोहचार नाही.

मॉइश्चरायझर वापरावे

होळी खेळण्यापूर्वी तुमच्या त्वचेला चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर लावावे. यामुळे तुमची त्वचा मऊ राहील आणि रंगांचा त्यावर फारसा परिणाम होणार नाही. जर तुम्ही त्याचा वापर केला नाही तर तुमची कोरडी त्वचा अधिक रंगेल आणि ती व्यवस्थित स्वच्छ होणार नाही

हर्बल रंगाचा वापर

आजकाल बाजारात हर्बल रंग मिळतात. होळी खेळताना फक्त ते रंग वापरावे. ते थोडे महाग असले तरी त्यांचा त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. रासायनिक रंगांमुळे अनेक त्वचा संबंधित समस्या निर्माण होतात.

टोपी घालावी

रंगांच्या प्रभावापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी नेहमी टोपी किंवा स्कार्फ वापरावा. यामुळे तुमचे केस झाकून राहतील. असे न केल्यास टाळूवर रंग येतो, त्यामुळे केस कमकुवत होऊ लागतात.

पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे

त्वचेला कितीही तेल किंवा मॉइश्चरायझर लावले तरी हलका रंग दिसतो. तुम्ही पूर्ण बाह्यांचे कपडे घातले तरी तुमची त्वचा धोकादायक रंगांपासून सुरक्षित राहते.

चष्मा लावावा

होळी खेळताना चष्मा जरूर वापरा. यामुळे रंग आणि गुलाल तुमच्या डोळ्यांपासून दूर राहतील. रंग डोळ्यांत गेल्यास इजा होऊ शकते. अनेक वेळा रासायनिक रंगांचा डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com