Men's Fitness 
लाइफस्टाइल

Multivitamin Powder: हजारो रुपये खर्च करु नका, घरच्या घरीच तयार करा स्वस्त आणि मस्त मल्टीविटामिन पावडर; वाचा रेसिपी

Homemade multivitamin powder Recipe: तुम्ही नैसर्गिक घटकांपासून घरीच स्वतःसाठी कमी खर्चात एक उत्तम मल्टीविटामिन बनवू शकता. घरी तयार केलेल्या मल्टीविटामिनचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

गोमंतक ऑनलाईन टीम

धावपळीच्या आयुष्यात अनेकांना आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही किंवा नाईजास्तव दुर्लक्ष होते. शरीराला पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे शरीर कमकुवत होऊ लागते. कधीकधी चक्कर येऊ लागते आणि कधीकधी थकवा जाणवू लागतो.

काहींचे पाय दुखू लागतात तर काहींची दृष्टी कमकुवत होते. अशा समस्या वाढल्यास डॉक्टरकडे गेल्यानंतर देखील ते मल्टीविटामिन आणि प्रथिने पर्यायी औषधे घेण्याचा सल्ला देतात.

डोळे झाकून मनाला वाटेल ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मल्टीविटामिन घेतल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम पाहायला मिळू शकतात. शिवाय असे मल्टीविटामिन खूप महागडे देखील असतात.

पण, तुम्हाला शरीर मजबूत करण्यासाठी मल्टीविटामिनसाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही नैसर्गिक घटकांपासून घरीच स्वतःसाठी कमी खर्चात एक उत्तम मल्टीविटामिन बनवू शकता. घरी तयार केलेल्या मल्टीविटामिनचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

लागणारे साहित्य

१०० ग्रॅम अळशीच्या बिया , १०० ग्रॅम तीळाच्या बिया, १०० ग्रॅम भोपळ्याच्या बिया, १०० ग्रॅम चियाच्या बिया आणि १०० ग्रॅम सूर्यफूलाच्या बिया

असे करा मल्टीविटामिन तयार

घरी मल्टीविटामिन पावडर बनवण्यासाठी, सर्वप्रथम सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करा. नंतर गॅसवर एक पॅन किंवा कोणतेही भांडे ठेवा. त्यात सर्व साहित्य ठेवा. नंतर ते भांड्यात २ ते ३ मिनिटे भाजून घ्या. गॅस बंद करा. थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये टाकून बारीक केल्यावर तुमचे मल्टीविटामिन तयार आहे.

खाण्याचे विविध पर्याय

दररोज एक चमचा ही पावडर एका ग्लास कोमट पाण्यात घालून प्या. याशिवाय, तुम्ही ते मिल्कशेक आणि स्मूदी इत्यादींमध्ये मिक्स करुन देखील घेऊ शकता. काही दिवसांत तुम्हाला फरक जाणवू लागेल. हे शुद्ध घटकांपासून घरी बनवले जाते, त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही.

Disclaimer: या लेखातून दिलेला सल्ला आणि सूचना फक्त माहितीसाठी आहे. काही समस्या किंवा आरोग्य विषयक प्रश्नांसाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT