Axiom 4 Mission | Shubhanshu Shukla
Axiom 4 MissionNASA

Axiom 4 Mission: अंतराळातून नमस्कार! चारही अंतराळवीर २८ तासांत पोचले अंतराळ स्थानकात; शुभांशू यांनी पाठवला पहिला संदेश

Shubhanshu Shukla: हे अंतराळयान २८,००० किमी/तास वेगाने ४१८ किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे.
Published on

नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर आज, म्हणजे २६ जून रोजी दुपारी ४.०० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. पूर्वी त्यांचा आगमन वेळ ४.३० वाजता होता. म्हणजेच हे अंतराळवीर वेळेच्या ३० मिनिटे आधी अंतराळ स्थानकावर पोहोचले आहेत.

त्याआधी, मिशन क्रूने अंतराळयानातून लाईव्ह संभाषण केले. यामध्ये शुभांशूने म्हटले होते- ‘अंतराळातून नमस्कार! माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत येथे येऊन मी खूप उत्साहीत आहे’.

ते म्हणाले, ‘जेव्हा आम्हाला व्हॅक्यूममध्ये सोडण्यात आले, तेव्हा मला फारसे बरे वाटत नव्हते. मी खूप झोपलो. मी इथे लहान मुलासारखा शिकत आहे... अंतराळात कसे चालायचे आणि कसे खायचे.’

Axiom 4 Mission | Shubhanshu Shukla
Pune Crime: गोव्यात जमिनी बळकावणाऱ्या अट्टल गुन्हेगार सुलेमान खानला आता पुणे पोलिसांकडून अटक

कॅप्टन शुक्ला यांनी पाठवला संदेश

'अंतराळातून सर्वांना नमस्कार. कालपासून मला सांगण्यात आले आहे की मी खूप झोपतोय, जे एक चांगले लक्षण आहे. मी त्याची चांगली सवय करत आहे, दृश्यांचा आनंद घेत आहे, संपूर्ण अनुभवाचा आनंद घेत आहे. लहान मुलासारखे शिकत आहे. अंतराळात कसे चालायचे आणि कसे खावे. चुका करणे चांगले आहे.'

हे अंतराळयान २८,००० किमी/तास वेगाने ४१८ किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे २८ तासांचा प्रवास पूर्ण केला आहे.

अ‍ॅक्सियम मिशन ४ अंतर्गत, सर्व अंतराळवीर २५ जून रोजी दुपारी १२ वाजता आयएसएसकडे रवाना झाले. तांत्रिक बिघाड आणि हवामानाच्या समस्यांमुळे हे मिशन ६ वेळा पुढे ढकलण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com