Chocolate Modak
Chocolate Modak  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

बाप्पांसाठी Chocolate Modak कसे बनवायचे

दैनिक गोमन्तक

गणपती बाप्पाचे (Ganpti Bappa) जल्लोषात आगमन झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक घरात मोदक (Modak) तयार केले जातात. बाप्पांना मोदक प्रिय आहे. घरोघरी त्यांच्यासाठी दररोज विविध प्रकारचे मोदक प्रसाद म्हणून तयार केले जात आहे. आज आपण चॉकलेट मोदकाची (Chocolate Modak) रेसिपी जाणून घेणार आहोत. चॉकलेट मोदक (Chocolate Modak) लहान मुलांचा आवडता मोदक आहे. चॉकलेट मोदक बनवायला जेवढे सोपे तेवढेच खायला स्वादिष्ट आहे. चला तर मग जाणून घेवूया चॉकलेट मोदक कसे तयार करायचे.

Chocolate Modak

* साहित्य

  • 250 डार्क चॉकलेट

  • 100 ग्रॅम नारळाचा कीस

  • 2 चमचे बदामचे तुकडे

  • 2 चमचे काजूचे तुकडे

  • 2 चमचे पिस्ताचे तुकडे

  • 50 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क

  • 1 चमचा तूप

  • मोडकचा साचा

  • डबल बॉयलर पॅन

* कृती

  1. सर्वात प्रथम चॉकलेट मोदक तयार करण्यासाठी माध्यम आचेवर डबल बॉयलरमध्ये डार्क चॉकलेट ठेवावे आणि ते वितळावे.

  2. जेव्हा चॉकलेट पूर्ण वितळेल तेव्हा गॅस बंद करावा. नंतर एका कढईत तूप घ्यावे. यात काजू बदाम, पिस्ता आणि नारळाचा कीस घालून 1ते 2 मिनिटे परतून घ्यावे.

  3. यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून घट्ट मिश्रण तयार करावे.

  4. नंतर या मिश्रणात चॉकलेट पेस्ट घालावी आणि चांगले मिक्स करावे. नंतर गॅस बंद कारावा. या मिश्रणाला मोदक साच्यात ठेवुन दाबावे.

  5. अशा पद्धतीने चॉकलेट मोदक तयार आहेत. यावर तुम्ही काजू किंवा बादमचा कीस वरुण टाकू शकता. झटपट तयार होणारे चॉकलेट मोदक नक्की घरी ट्राय करून पाहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

SCROLL FOR NEXT