Lizard Home Remedy  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lizard Home Remedy : भिंतीवरच्या पालीमुळे आहात त्रस्त; मग करून पाहा या घरगुती टिप्स

घरात भिंतीवर पाल पाहून विचित्र वाटते. हे पाहून लहान मुले आणि मोठी माणसेही घाबरतात, तर काहींच्या किंकाळ्याही निघतात.

दैनिक गोमन्तक

Lizard Home Remedy : घरात भिंतीवर पाल पाहून विचित्र वाटते. हे पाहून लहान मुले आणि मोठी माणसेही घाबरतात, तर काहींच्या किंकाळ्याही निघतात. पाल भयानक दिसतात आणि त्यांच्यापासून मुक्त होणे सोपे नाही. मात्र घरातील काही गोष्टींच्या मदतीने आपण त्यांना दूर करू शकतो.

अंड्याचे कवच

घरातील ज्या ठिकाणी पाल येण्याची शक्यता असते अशा ठिकाणी अंड्याची टरफले ठेवा. अंड्याच्या वासाने पाल येणे बंद होते.

कॉफी आणि कत्था पावडर

कॉफी सहसा प्रत्येकाच्या घरात मिळते. कॉफी पावडर आणि कत्था पावडर याची जाडसर पेस्ट बनवा. त्यापासून लहान गोळ्या बनवा आणि ज्या ठिकाणी पाल येते त्या ठिकाणी ठेवा. त्यातून येणारा वास पालीला आवडत नाही.

कांदा आणि लसूण

कांद्याच्या सालीने तुम्ही पालीला घरातून हाकलून देऊ शकता. यासाठी कांद्याची साले घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा. यासोबतच खिडक्या आणि दरवाजांवर लसणाच्या कळ्या लटकवाव्यात. ही पद्धत करून पाहिल्यानंतर पाल कधीही तुमच्या घराकडे मागे वळून पाहणार नाहीत.

काळी मिरी

पालीला काळी मिरीपासून ऍलर्जी असते. काळी मिरी पावडर पाण्यात विरघळवून ठेवा. घराच्या त्या कोपऱ्यांवर फवारणी करा जिथून पाल जास्त येतो. तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर देखील वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट! 'टॅब्लेट्स इंडिया'नं स्पष्टचं सांगितलं; 'त्या' अपघाताशी आमचा संबंध नाही

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT