Morning Breakfast| Pancack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast: भाज्या अन् बेसनपासून बनवा टेस्टी पॅनकेक, नोट करा रेसिपी

लहान मुलांना काही तरी नवीन स्नॅक्स हवे असेल तर टेस्टी आणि हेल्दी पॅनकेक बनवून देऊ शकता.

Puja Bonkile

Tasty Veggie Pancake Recipe: मुले अनेकवेळा नवीन काही खाण्याची मागणी करत असतात. अशावेळी तुम्ही त्यांना टेस्टी आणि हेल्दी स्नॅक्स म्हणून भाज्या आणि बेसनपासून चविष्ट पॅनकेक बनवून खायला देऊ शकता.

हे पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळी स्नॅक्स म्हणून खायला चांगले आहे. तसेच तुम्ही हे त्यांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया चविष्ट व्हेज पॅनकेक कसे बनवायचे.

  • व्हेज पेनकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप बेसन

अर्धा कप रवा

2 गाजर किसलेले

1 कांदा बारीक चिरलेले

कोबी बारीक चिरलेली

कोथिंबीर बारीक चिरलेली

काही पुदिन्याची पाने

2-3 बारीक चिरलेली हिरवी मिरची

1 चमचा लाल तिखट

काळी मिरी बारीक केलेली

अर्धा चमचा ओवा

चिमूटभर हिंग

चवीनुसार मीठ

  • कृती

या हेल्दी आणि टेस्टी पॅनकेक मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या बारीक चिरून टाकू शकता. पॅनकेक बनवण्यासाठी सर्वात पहिले बेसन आणि रवा यांचे घट्ट बॅटर तयार करावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे.

सोबत ठेचलेली काळी मिरी, ओवा, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकावी. गाजर, बटाटे, कोबी आणि कांदे चांगले किसून टाका. त्यात कोथिंबीर आणि काही पुदिन्याची पाने बारीक चिरून टाका.

आता या सर्व गोष्टी हाताने नीट मिक्स करावे. हे मिश्रण हातातून घेता येईल एवढे घट्ट ठेवावे. यामुळे भाज्यांच्या पाण्याव्यतिरिक्त फार कमी पाणी घालून पीठ तयार करा. तवा गरम करून त्यावर बॅटर टाका आणि चमच्याने दाबून गोल व सपाट आकार द्या. तेल घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजवा. केचप आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह कर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

Bondla Sanctuary: प्रतिक्षा संपली! बोंडलामध्ये दिसणार 'अस्‍वल' आणि 'हरीण'; छत्तीसगड, महाराष्‍ट्रातून होणार आगमन

Goa Crime: पोलीस असल्याचे भासवून पर्वरी महामार्गावर अडवली गाडी, 8 लाख लुटले; इराणी गँगमधील संशयिताला पुण्यातून अटक

Goa Murder Case: गाडी सापडली कणकवलीत, संशयितांकडून बेदम मारहाण; पीर्ण येथील खूनप्रकरणाचा वाचा घटनाक्रम..

Ind Vs SA: भारत की आफ्रिका! 'टॉस' ठरणार निर्णायक? महिला क्रिकेट टीम स्वप्नपूर्तीचा उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT