New Year 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

New Year 2024: 'या' टिप्स ठेवतील ऑफिसमधील वातावरण हेल्दी

ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण ठेवायचे असेल कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

New Year 2024: सध्या आपण घरात कमी ऑफिसमध्ये काम करत जास्त वेळ असतो. दिवसाचे 8 ते 10 तास ऑफिसमध्ये असल्याने आपल्या सभोवताली सकारात्मक वातावरण असणे गरजेचे आहे. पण अनेकवेळा काही गोष्टींमुळे नकारात्मकता वाढते. त्याचा परिणाम शरिर आणि कामावर होतो. यापासून दूर राहायचे असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

  • नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा

ऑफिसमध्ये आपल्या कामाच्या व्यतिरिक्त नकारात्मक वागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावे. कारण त्यामुळे नकारात्मकता वाढते. यामुळे त्याचा तुमच्या कामावर देखील परिणाम होतो.

  • कामावर लक्ष द्यावे

ऑफिसमध्ये असताना कामावर लक्ष द्यावे. दिलेले काम वेळेवर पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा. स्वत:चा विकास व्हावा असे वाटत असेल तर नव्या गोष्टी शिकण्यावर भर द्यावा.

  • पर्सनल लाईफ ऑफिसच्या बाहेर ठेवा

आपण अनेकवेळा ऑफिसमध्ये वैयक्तिक गोष्टी बोलतो. त्यावरून अनेक लोक आपल्याला जज करतात. परिवारातील लोक आपली गोष्ट ऐकून घेतात पण प्रोफेशनल लाईफमध्ये काही गोष्टींना बंधने असतात. ती पाळणे गरजेचे असते.

  • गॉसिप टाळावे

ऑफिसमध्ये इतर सहकाऱ्यांबद्दल गॉसिप करणे चुकीचे आहे. यामुळे नकारात्मकता निर्माण होते. यामुळे ऑफिसमध्ये चुकूनही गॉसिप करू नका.

  • ब्रेक घ्यावा

ऑफिसमध्ये काम करताना ठराविक अंतराने ब्रेक घेणे गरजेचे असते. एक सारखे काम केल्याने तुम्हाला थकवा तर येतोच पण वातावरण खूप कंटाळवाणे बनते. यामुळे ब्रेक घ्यावा, थोडे फिरून यावे,चहा प्यावा आणि मग परत कामाला सुरूवात करावी.

  • बॉससोबत स्पष्ट बोलावे

जर तुम्हाला तुमचे काम कंटाळवाणे वाटत असेल आणि दुसरे काही करायचे असेल तर तुमच्या बॉस किंवा वरिष्ठांशी त्याबद्दल स्पष्ट बोलावे. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करताना आनंद मिळेल.

ऑफिस सहकाऱ्यांशी मैत्री

ऑफिसमध्ये आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी मैत्रीपुर्ण संबंध ठेवावे. कामाच्या ठिकाणी मतभेद झाल्यास आपसात सोडवून घ्यावे. वैयक्तिक अडचणी असल्यास स्पष्ट बोलावे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असल्यास काम चांगल्या पद्धतीने होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT