Immunity Booster Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Immunity Booster: 'या' 5 पालेभाज्यांनी वाढवा लहान मुलांची प्रतिकारशक्ती

कोरोना आणि इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा.

दैनिक गोमन्तक

लहान मुलांच्या प्रतिकारशक्तीची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोरोना आणि इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा. यासाठी त्यांना पोषक आहार देणे गरजेचे आहे. यात फळे आणि भाज्यांचा मुलांच्या आहारात समावेश करावा जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळेल. (Immunity Booster Food News )

* या भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात

* ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करतात.लहान मुलीना तुम्ही त्यांना सूप किंवा भाजीच्या स्वरूपात ब्रोकोली खाऊ शकता.

* पालक

पालकामध्ये व्हिटॅमिन सी, ई, अँटीऑक्सिडंट्स, लोह, कॅरोटीनॉइड्स आणि इतर घटकांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी (Health) खूप महत्वाचे आहे. पालकाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच मुलांच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होते आणि एवढेच नाही तर व्हिटॅमिनची कमतरताही पूर्ण होते.

* रताळे

रताळे चवीला गोड असते. त्यामुळेच बहुतेक मुलांना ते आवडते. रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि यामुळेच ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, कारण ते व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत मानला जातो.

* हळद

आपल्या स्वयंपाक घरात हळद असते. हळदीमध्ये असे गुणधर्म असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती टिकून राहावी यासाठी भाज्यांमध्ये हळदीचा अधिकाधिक वापर करावा.

* आले-लसूण

हे पदार्थ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आरोग्याला यापासून अनेक फायदे मिळतात. दुसरीकडे, लसणात असे काही घटक आढळतात जे सर्दीपासून बचाव करतात. अशा प्रकारे, या दोन्ही गोष्टींचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT