Honeymoon Destination Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Honeymoon Destination: भारतातील 'या' सुंदर ठिकाणी प्लॅन करा हनीमून ट्रिप

Honeymoon Destination: जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत हनिमूनला जायचे असेल, पण तुमचे बजेट जास्त नसेल तर पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.

Puja Bonkile

Honeymoon Destination indias low budget places for honeymoon relationship

लग्नानंतर अनेक लोक हनिमुनचा प्लॅन करतात. आजकाल लोक लग्न जुळताच लगेचच हनिमूनला जाण्याचा विचार करतात. लग्नाआधीही लोक कुठे जायचे आणि कधी जायचे याचे प्लॅनिंग करतात. हनिमूनला कपल्स एकमेकांसोबत उत्तम वेळ घालवतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत हनिमूनला जायचे असेल, पण तुमचे बजेट जास्त नसेल तर पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.

औली

जर तुम्हाला अशा ठिकाणी जायचे असेल जे फार महाग नाही, तर औली हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे उत्तराखंडचे एक सुंदर हिल स्टेशन आहे. तुम्ही जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण बनवू शकता.

कसाल

कसाल दिल्लीपासून फार दूर नाही. हिमाचल प्रदेशातील हे एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. जे सुंदर नैसर्गिक दृश्यांसाठी ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात हनिमून कपल्स येतात. कसालमध्ये अनेक कपल्स अॅक्टिव्हिटी होतात, जे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील अंतर कमी करतात.

हंपी

जर तुम्ही कर्नाटकात रहात असाल तर हंपी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे बंगलोरपासून 353 किमी अंतरावर आहे. तुम्ही ट्रेन किंवा बसने येथे सहज जाऊ शकता. इथे ट्रेनने गेल्यास जास्त भाडे द्यावे लागणार नाही. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.

मसुरी

दिल्लीहून मसुरीला जाण्यासाठी तुम्हाला बस आणि ट्रेन सहज मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत येथे नक्की जाऊ शकता. येथे राहण्यासाठी आणि प्रवास करण्यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्कूटरवर फिरू शकता.

मॅक्लिओडगंज

दिल्लीहून जर तुम्हाला मॅक्लिओडगंज जायचे असेल तर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. एका कपल्सला अंदाजे 10 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT