Dry Skin Treatment at Home
Dry Skin Treatment at Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dry Skin: घरगुती उपायांनी कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका, करा 'हे' उपाय

गोमन्तक डिजिटल टीम

Dry Skin Treatment at Home: थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी (Dry Skin) होण्याचा त्रास बहुतेक सर्वांना जाणवतोच. विशेषतः कार्यक्रमाला, समारंभाला जाताना कोरडी त्वचा कशी लपवावी याची काळजी आपण घेत असतो. कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी बाजारू उत्पादनापेक्षा घरगुती उपाय करून देखील आपण कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळवू शकतो.

नारळाचे तेल-

नारळाच्या तेलामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी नारळाचे तेल फायदेशीर मानले जाते. कोरड्या त्वचेवर नारळाचे तेल उत्तम मॉइश्चरायजरचे काम करते. यासाठी झोपण्यापुर्वी नारळाच्या तेलाने चेहऱ्याची आणि पूर्ण अंगाचे मालिश करावे

बदामाचे तेल-

बदामाच्या तेलात अनेक पोषक तत्वे असून ते त्वचेचे पोषण करते. कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी याचा वापर नक्कीच करावा. या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात मिसळून आंघोळ करावी. यामुळे त्वचा मऊ तर राहतेच पण त्यामुळे त्वचेची चमकही वाढते.

पपईचा फेस पॅक -

कोरड्या त्वचेसाठी पपईचा फेस पॅक कामी येतो. पपईचा फेस पॅक वापरल्याने बऱ्याच जणांना कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळते.

पपईचा फेस पॅक बनवण्यासाठी:- पाव कप चिरलेली पपई घेऊन त्यात अर्धा चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस त्यामध्ये घालावा आणि मिश्रण चांगले एकजीव करावे. तयार झालेला पपईचा नैसर्गिक फेस पॅक चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावावा, त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा मास्क हिवाळ्यात कोरड्या त्वचेपासून मुक्ती देतो

मध-
मध आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते. ज्यांना त्वचा सतत कोरडी होते, त्वचेतील आद्रता कमी होते त्यांच्यासाठी मध फायदेशीर ठरते. मधाचा वापर केल्याने त्वचा मऊ आणि निरोगी राहते.

एलोवेरा-
एलोवेराही त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायझर मानले जाते. अँटीबॅक्टरियल, अँटिसेप्टिक, अँटीऑक्सिडेंट यांसह विटामिन बी १, बी २, बी ६, बी १२ आढळते, जे त्वचेचा कोरडेपणा दुर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

Goa Election 2024 Live: मुख्यमंत्री सावंत यांचे सपत्नीक मतदान

SCROLL FOR NEXT