Home Remedies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies: मळमळ अन् उलटी होत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय

उलट्या आणि मळमळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येमागे अनेक कारणे असु शकतात.

Puja Bonkile

Home Remedies For Vomiting: उलट्या आणि मळमळ होणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येमागे अनेक कारणे असु शकतात. मळमळ नेहमी उलट्या होण्याआधी होते आणि उलट्या झाल्या की मळमळ थांबते.

पण कधी कधी जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर एक- दोन वेळा उलट्या झाल्या असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता.चला तर मग जाणून घेऊया हे घरगुती उपाय कोणते आहेत.

  • बडीशेप

बडीशेप खाल्याने मळमळ होणे कमी होते. बडीशेप हळूहळू चावून खाल्यास पोटालाही थंडावा मिळतो. तुम्हाला लगेच आराम मिळेल. तुम्ही पाण्यात उकळून सुद्धा बडीशेपचे पाणी पिऊ शकता.

  • भरपुर पाणी प्यावे

जेव्हा तुम्हाला उलट्या होतात तेव्हा शरीरात पाणी कमी होते.यामुळे अॅसिडिटी वाढते. म्हणून नारळ पाणी ,लिंबु पाणी किंवा साधे पाणी प्यावे.

  • एक्यूप्रेशर

एक्युप्रेशर केल्याने उलट्या आणि मळमळ कमी होते.यासाठी मनगटावर तीन बोटे ठेवावे, अंगठा तर्जनी खाली ठेवावा, या बिंदुला वर्तुळाकार गतीने मसाज करा आणि दुसऱ्या मनगटावरही असेच मसाज करावी.

  • लवंग

लवंग खाल्याने देखील होणारी मळमळ कमी होते. यामध्ये अँटी बॅक्टेरिअ गुणधर्म असतात. तुम्हाला जर मळमळ होत असेल तर लगेच लवंग तोंडात ठेवावी. तुम्हाला आराम मिळेल.

  • पुदिना

पुदिना खाणे पोटासाठी फायदेशीर असते. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. यामुळे मळमळ किंवा उलट्या झाल्यास पुदिन्याचे पाने चावून खावी. तसेच तुम्ही पाण्यात पुदिना उकळून पाणी देखील पिऊ शकता.

  • आलं

मळमळ होत असेल तर आल्याचा चहा प्यावा. तसेच तुम्ही आलं बारिक करून पाण्यात उकळून पिऊ शकता. तुम्ही आल्याचा तुकडा तोंडात ठेवल्यास लगेच बरे वाटेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT