Home Decor Idea For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Decoration Ideas for Home: होळनिमित्त 'अशी' करा घराची कलरफुल सजावट

Simple home decor ideas for Holi: होळी हा रंगांचा सण आहे असून या दिवशी घराची कलरफुल सजावट करायची असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

home decoration idea for holi festival 2024

होळी हा रंगाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी एकमेकांच्या घरी जावून रंग लावला जातो आणि शुभेच्छा दिल्या जातात. तसेच विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. यंदा होळी हा सण 25 मार्चला साजरा केला जाणार आहे.

फुले आणि रांगोळीने आपण आपले घर अधिक सुंदर बनवतो. ही सजावट आणि खाद्यपदार्थ आपल्या होळीच्या आनंदात भर घालतात. होळीच्या दिवशी घर सजवण्यासाठी आणखी पद्धतींचा वापर करू शकतो हे जाणून घेऊया.

  • फुलांची सजावट

तुमच्या घराच्या दारावर झेंडू आणि आंबाच्या पानांचे तोरण लावू शकता. ही फुले तुमचे घर नवीन ताजेपणा आणि सौंदर्याने भरतील. यामुळे घर अधिक सुंदर दिसेल आणि सर्वांना आनंद वाटेल.

  • रंगीत पडदे आणि कुशन

तुमचे घर रंगीबेरंगी पडदे आणि कुशनने सजवू शकता. लाल, पिवळा, हिरवा, निळा असे डार्क रंग वापरल्याने घर आनंदाने आणि सकारात्मकते भरते. ही सजावट तुमचे घर आणखीनच आकर्षक बनवेल. या सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचे घर होळीसाठी सुंदर सजवू शकता.

  • फुलांची रांगोळी

घराच्या मुख्य दरवाजावर एक सुंदर रांगोळी काढू शकता. यासाठी रंगीत फुलांचा वापर करू शकता. रांगोळी तुमच्या घराचे प्रवेशद्वार अधिक आकर्षक बनवेल आणि सर्वांना आकर्षित करेल. यावरून सणाचा आनंद आणि उत्साह दिसून येतो.

  • रंगीत भिंती

जर तुम्हाला तुमच्या घराला नवीन आणि फ्रेश लूक द्यायचा असेल, तर भिंतींना नवीन रंगाचा कोट का देऊ नये? काही भिंती चमकदार रंगांनी रंगवा. सनी येलो, स्काय ब्लू किंवा ग्रीन - हे सर्व रंग तुमचे घर आनंदी आणि चैतन्यमय बनवतील. यामुळे तुमचे घर तर सुंदर दिसेलच पण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालाही एक नवी ऊर्जा जाणवेल.

  • लाइटिंगची सजावट

तुम्ही होळीनिमित्त घरात रंगीत लाइटिंगने सजावट केली जाते. यामुळे घराला आकर्षक लूक मिळतो. बाजारात विविध प्रकारच्या लाइटिंग मिळतात. त्या घरातील खिडकी किंवा दारांवर लावू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT