Asthma  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Asthma: पडदे, कार्पेट... घरातील सजावटीच्या वस्तूच वाढवतायेत अस्थमाचा धोका? काय सांगतात डॉक्टर? जाणून घ्या

Home Decor Health Risks: जर एखाद्या व्यक्तीला घरात वारंवार ऍलर्जी होत असेल किंवा अस्थमाचे झटके येत असतील, तर त्यांनी एकदा आपल्या घरातील फर्निचर आणि पडदे-कार्पेट तपासायला हवेत.

Manish Jadhav

Home Decor Health Risks: आपण आपलं घर सुंदर दिसावं म्हणून पडदे, कार्पेट आणि विविध फर्निचर वापरतो. यालाच आजकाल 'एस्थेटिक' (Aesthetic) असे म्हटले जाते, ज्याचा अर्थ काहीतरी वेगळे आणि आकर्षक दिसावे असा असतो. पूर्वी लोक सणांच्या वेळी किंवा खास प्रसंगीच घर सजवत असत, पण आता लोकांना नेहमीच आपलं घर सुंदर हवं असतं. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, सजावटीच्या या वस्तू गंभीर आजाराच्या कारण ठरु शकतात. होय, चकित झालात ना... चला तर मग मॅक्स हेल्थकेअरच्या पल्मोनोलॉजी विभागाचे संचालक आणि श्वसन चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. आशीष जैन यांच्याकडून याबाबत जाणून घेऊया...

श्वासाशी संबंधित आजारांचा वाढता धोका

डॉ. आशीष जैन यांच्या मते, हल्ली प्रत्येक रोग आणि प्रत्येक समस्या श्वासाशी संबंधित आहे. कोरोनापासून ते सीओपीडी (COPD) पर्यंत, अनेक आजारांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे ही एक सामान्य समस्या आहे. अस्थमा (दमा) हा एक सामान्य श्वसन आरोग्याचा प्रश्न असला तरी तो जीवघेणा ठरु शकतो. या आजारात रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येते, अस्थमाचे झटके येतात, जे अचानक येतात आणि त्यामुळे ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता भासू शकते.

पडदे-कार्पेटमुळे वाढतोय आजार?

डॉक्टर सांगतात की, आपल्या घरांमध्ये वापरले जाणारे पडदे आणि कार्पेट लोक योग्यप्रकारे स्वच्छता करत नाहीत. काही घरांमध्ये तर ते अनेक महिन्यांपर्यंत बदलले जात नाहीत, ज्यामुळे त्यांच्यावर धूळ, माती आणि जीवाणू (बॅक्टेरिया) जमू लागतात. जेव्हा घरात पंखा किंवा कुलर चालतो, तेव्हा हवेसोबत ही धूळ आणि माती आपल्या नाक व तोंडावाटे शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे आजार वाढतात.

डॉ. जैन यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला घरात वारंवार ऍलर्जी होत असेल किंवा अस्थमाचे झटके येत असतील, तर त्यांनी एकदा आपल्या घरातील फर्निचर आणि पडदे-कार्पेट तपासायला हवेत. कदाचित हीच या समस्यांची मूळ कारणे असू शकतात.

काय उपाय करावेत?

अस्थमाच्या रुग्णांनी आपल्या घरात सुती आणि हलक्या वजनाचे पडदे वापरावेत.

त्यांनी घरात कार्पेट वापरणे टाळावे, कारण त्यातून धूळ निघते, ज्यामुळे अस्थमाचा झटका येण्याचा धोका वाढतो.

घराची साफसफाई करताना झाडूऐवजी व्हॅक्यूम क्लिनर (Vacuum Cleaner) आणि ओल्या पोछ्याचा वापर करावा.

अस्थमाच्या रुग्णांनी आपल्यासोबत नेहमी इन्हेलर ठेवावा. घरात एक वेगळा, गाडीत एक वेगळा, ऑफिसमध्ये एक वेगळा आणि बेडरुममध्ये असल्यास पलंगाजवळ नेहमी आपत्कालीन स्थितीसाठी एक इन्हेलर असावा. डॉक्टरांनी दिलेल्या या सल्ल्यांचे पालन केल्यास तुम्ही तुमच्या घरातील वातावरणाला अधिक आरोग्यदायी (Health) बनवू शकता आणि श्वसनासंबंधीच्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

Rashi Bhavishya 07 September 2025: नोकरीत संयमाने काम केल्यास चांगले यश , आज मेहनतीपेक्षा हुशारी जास्त उपयोगी ठरेल

SCROLL FOR NEXT