Holi Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Tips: गर्भवती महिलांनी होळी खेळतांंना ही चुक करु नये, अन्याथा..

गर्भवती महिलांनी होळी खेळतांंना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

Tips For Celebrating Holi During Pregnancy: होळी हा सण मौजमस्तीत, रंगात रंगून मग्न होऊन 8 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यादरम्यान मजा तर असतेच, पण अनेकदा ती घातक येण्याची भीती असते.

यामुळे होळी लोकांसाठी सामान्य असते पण पण गरोदर महिलांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. एक चुक आई आणि बाळ दोघांसाठी धोकादायक ठरू शकते. गर्भवती महिलांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेउया.

  • हर्बल रंगांचा वापर

गर्भवती महिलांची त्वचा इतर लोकांपेक्षा अधिक संवेदनशील असते. आजकाल रंग रसायने आणि धातूपासून बनवले जातात आणि त्यात काचेचे तुकडे असतात. लीड ऑक्साईड, कॉपर सल्फेट यासारख्या अनेक धातूंमुळे आई आणि मूल दोघांनाही इजा होऊ शकते.

यामुळे मज्जासंस्थेवर आणि श्वसन प्रणालीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. रासायनिक रंगांमुळे गर्भपात, वेळेपूर्वी प्रसूती आणि बाळाचे कमी वजन अशा समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत हर्बल रंगांनीच होळी खेळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा त्यापासून अंतर ठेवा.

Pregnancy
  • गर्दीपासून अंतर ठेवावे

होळी खेळताना अनेकदा धावपळ होत असते. त्यामुळे जर तुम्ही पहिल्या तिमाहीत जात असाल तर ते टाळावे. कारण यावेळी जास्त धावल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय धावण्यामुळे तणाव आणि थकवा येतो. याचा तुमच्या मुलावरही परिणाम होतो. गर्दीच्या आणि नृत्याच्या ठिकाणांपासून दूर राहा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही.

  • खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी

होळीमध्ये तेलकट पदार्थ (Food) बनवले जातात. त्याशिवाय थंडाईमध्ये भांग मिसळली जाते. जी तुम्ही टाळली पाहिजे. भांगच्या सेवनामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा आणि लिंबू पाणी प्यावे.

  • पाणी खेळणे टाळावे

जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही कोरडी होळी खेळावी. कारण ओली होळी खेळल्याने तुम्हाला घसरण्याची भीती असते, त्यामुळे तुमचे नुकसान होते आणि तुमच्या न जन्मलेल्या मुलालाही धोका असतो. याशिवाय ओली होळी खेळल्याने त्वचेची अॅलर्जी होण्याची शक्यता वाढते.

  • आरामदायक कपडे घाला

होळी खेळताना तुमच्या त्वचेला हानिकारक रंगांपासून वाचवणारे कपडे घाला. तुम्ही असे शूज आणि चप्पल घालावी, जे परिधान करण्याचा तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्हाला घसरण्याची किंवा पडण्याची भीती वाटत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT