Holi Party Look Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Party Look: होळी पार्टीत 'या' स्टायलिश आउटफिटमध्ये दिसाल हटके

Holi Party Outfit: होळी पार्टीत अनेक लोक हटके स्टाइल करून येतात. तुम्हालाही यंदा हटके दिसायचे असेल तर तुम्ही पुढील आउटफिट आयडियाज घेऊ शकता.

Puja Bonkile

try these comfortable clothes for holi party

देशभरात मोठ्या उत्सहात आणि आनंदात होळी साजरी केली जाते. यासाठी अनेक लोक आधीपासूनच तयारी सुरू करतात. कुणी आपल्या घरी पार्टी ठेवतात तर अनेक ठिकाणी ऑफिसमध्ये पार्टी प्लॅन करतात.

तिथे सगळे तयार होऊन होळी खेळतात. यंदा होळी 25 मार्च रोजी साजरा केली जाणार आहे. प्रत्येकजण त्याची तयारी सुरू करतात. जर तुम्हीही होळी पार्टीला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अगोदरच आरामदायी कपड्यांची निवड करून ठेवा.

यासाठी तुम्हाला वेगळी खरेदी करायची गरज नाही तुमच्या कपाटात असे अनेक ड्रेस आधीच असतील. पण तुम्हाला काही नवीन कपड्यांची खरेदी करायची असेल तर करू शकता. आरामदायी कपड घालून तुम्ही होळी पार्टीचा आनंद घेऊ शकाल.

सैल टी-शर्ट आणि जिन्स

होळी पार्टीत तुम्ही सैल टी-शर्ट आणि जीन्स घालू शकता. यासाठी, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही घरात ठेवलेला कोणताही जुना टी-शर्ट किंवा पांढरा टी-शर्ट प्रिंट करून तो घालू शकता. तसेच आजकाल मार्केटमध्ये होळीनिमित्त अनेक स्वस्त पांढरे कपडे मिळतात. तुम्ही ते घरी ठेवलेल्या जुन्या जीन्ससोबत घालू शकता. यामध्ये तुम्हाला आरामही मिळेल.

शॉर्ट कुर्ती

तुम्हाला स्टायलिश आणि कम्फर्टेबल व्हायचे असेल तर होळी पार्टीत प्लाझो पँटसोबत शॉर्ट कुर्ती घालू शकता. तुम्ही कॉटन स्टॉल्स देखील घेऊ शकता. यामुळे तुम्ही हटके आणि आरामदायी दिसाल. होळीनिमित बाजारात प्रिंटमध्ये अनेक कुर्त्या तुम्हाला मिळतील.

कुर्ती

होळी पार्टीत प्लाझो किंवा लूज जीन्ससोबत पांढऱ्या रंगाची प्रिंटेड कुर्तीही घालू शकता. तुम्ही त्याच्या बरोबर कॉन्ट्रास्ट रंगाची ओढणी देखील घेऊ शकता. तुमच्याकडे कुर्ती नसेल तर तुम्ही शंभर रूपयापासून सुरू होणाऱ्या कुर्ती खरेदी करू शकता. या आउटफिटमध्ये तुम्ही स्टायलिश दिसाल.

लाँग स्कर्ट

होळी पार्टीत हटके आणि आरामदायी दिसण्यासाठी लाँग स्कर्ट आणि कुर्ती घालू शकता. यामुळे तुम्ही होळी खेळण्याचा आनंद लुटू शकता. तुमच्याकडे लाँग स्कर्ट नसेल तर बाजारात शंभर ते दोनशे रूपयापर्यंत लाँग स्कर्ट मिळेल. तुम्ही वरील आउटफिट घालून होळी पार्टीचा आनंद घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT