HMPV Virus Dainik Gomantak
लाइफस्टाइल

HMPV Virus: एचएमपीव्ही व्हायरस किडनी करतोय खराब? जाणून घ्या संशोधन काय सांगतेय

HMPV Virus: चीनमध्ये पसरलेला ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) हळूहळू जगात पसरत आहे. भारतातही या संसर्गाची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Manish Jadhav

चीनमध्ये पसरलेला ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस (HMPV) हळूहळू जगात पसरत आहे. भारतातही या संसर्गाची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालय या विषाणूबद्दल गंभीर आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना या विषाणूबाबत सतर्क राहण्यास देखील सांगितले आहे. एचएमपीव्ही हा श्वसनाचा आजार आहे. त्याची लक्षणे कोरोनासारखीच आहेत. कोरोनामध्ये ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसली होती. या विषाणूमध्येही अशीच लक्षणे दिसून येत आहेत. मात्र ती कोरोनांच्या लक्षणांइतकी घातक नाहीत.

दरम्यान, ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस विशेषतः मुले आणि वृद्धांवर परिणाम करत आहे. या संसर्गाचा परिणाम 2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्येही दिसून आला आहे. याशिवाय, तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तीला देखील संक्रमित करु शकतो. या संसर्गामुळे आरोग्य विभागांमध्ये चिंता वाढत आहे. त्याचबरोबर सामान्य लोकही याबद्दल चिंतेत आहेत. कोरोना विषाणूमुळे शरीरात अनेक दुष्परिणाम दिसून आले. एचएमपीव्हीमुळेही असे होऊ शकते का? काही तज्ञांच्या मते, या विषाणूचा मूत्रपिंडांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मूत्रपिंडांवर परिणाम

तज्ञांचे म्हणणे आहे की, या विषाणूचा मूत्रपिंडांवर थेट नकारात्मक परिणाम होण्याची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु त्याचा अप्रत्यक्ष परिणाम झाल्याचे काही पुरावे आहेत. तथापि, एचएमपीव्हीचा मूत्रपिंडांवर थेट परिणाम होत नाही. काही प्रकरणांमध्ये, रुग्णाला डायलिसिसची आवश्यकता भासतेय, अशा परिस्थितीत मूत्रपिंडांवर परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते, एचएमपीव्हीचा मूत्रपिंडांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

अमेरिकेतील (America) रुग्णालयात दाखल झालेल्या मुलांवरील एका अभ्यासात असे आढळून आले की, HMPV संसर्गामुळे मूत्रपिंडाचा (AKI) आजार होण्याचा धोका वाढतो. हा अभ्यास एचएमपीव्ही संसर्ग आणि मूत्रपिंडाच्या आजारांमधील संभाव्य संबंध काही प्रमाणात सिद्ध करतो. तथापि, याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे.

मूत्रपिंडाची समस्या

एचएमपी संसर्गामुळे श्वसनाचे गंभीर आजार होतात. शरीरात श्वसन संसर्गामुळे हायपोक्सियाचा धोका देखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते आणि मूत्रपिंडातील रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो. त्यामुळे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करु शकत नाही. विशेषतः आजारपणात, जास्त ताप आणि उलट्यांमुळे मूत्रपिंडाच्या समस्या वाढतात.

ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा

लघवी व्यवस्थितरित्या न होणे

पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे

थकवा आणि अशक्तपणा

सतत पोटदुखी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

Valpoi News: पुलावरून घेतली उडी, स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले प्राण; वाळपईत आत्महत्येचा प्रयत्न

Goa Assembly: 'भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका' आलेमाव आक्रमक; 'इतरांची उदाहरणं देऊ नका' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT