Sameer Amunekar
हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी 10 दिवस ते एक महिना पूर्वीच शरीर थकल्यासारखं वाटतं. 2019 च्या अहवालानुसार एका हे लक्षणं पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात असते.
शरीराला घाम येणे सामान्य आहे. परंतु बसताना, खाताना, झोपताना भरपूर घाम येत असेल तर वेळीच सावध व्हा. हृदयाच्या नसा ब्लॉक असल्यास देखील जास्त घाम येऊ शकतो.
छातीमध्ये सतत वेदना किंवा जडपणा वाटत असेल. तसंच छातीच्या डाव्या बाजूस तीव्र वेदना जाणवत असतील तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रारंभिक लक्षण आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकते.
तुम्हाला वेळोवेळी विनाकारण चक्कर येत असेल तर त्याकडं दुर्लक्ष करू नका. चक्कर येणं, डोकेदुखी, छातीत दुखणं आणि रक्तदाब कमी होणं ही हृदयविकाराची लक्षणं असू शकतात.
जेव्हा हृदयाला पुरेसं रक्त मिळत नाही, तेव्हा हृदयाची गती सामान्यपेक्षा जास्त असते. तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये काही काळ बदल जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं हे घातक ठरू शकतं.