high blood pressure hypertension patients must know these 7 things to control blood pressure and stay healthy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

हायपरटेन्शनच्या प्रत्येक रुग्णाला 'या' 7 गोष्टी माहित असणे आवश्यक

तणाव आणि अनियमित जीवनशैली हे आज उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण

दैनिक गोमन्तक

उच्च रक्तदाब बद्दल तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे अशा गोष्टी: तणाव आणि अनियमित जीवनशैली हे आज उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण आहे. उच्च रक्तदाब असेल तर यात हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे, अंधत्व येण्याचा धोका वाढवण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जगभरातील लाखो लोक दरवर्षी मृत्यूला कवटाळतात. हृदयाशी संबंधित समस्या आणि मृत्यू कमी करण्यासाठी रक्तदाब (blood-pressure) वाढण्यापासून रोखणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

उच्च रक्तदाबाची समस्या काय आहे

उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये धमनी विरूद्ध रक्त भिसरण क्रिया वाढते. सामान्यतः जेव्हा रक्तदाब 140/90 च्या वर असतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. जर रक्तदाब 180/120 पेक्षा जास्त असेल तर ही स्थिती गंभीर मानली जाते.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात-

उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी पोषक तत्वांनी युक्त अन्न खावे. फळे आणि भाज्या नियमितपणे खाव्यात.

मीठ जास्त प्रमाणात सेवन करू नये. दिवसभराच्या आहारात फक्त 5 ते 6 ग्रॅम मीठ नियमित सेवन करावे.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटॅशियमयुक्त पदार्थ जसे की बटाटे, संत्री, मनुका, द्राक्षे आहारात घ्या, त्यामुळे सोडियमचा प्रभाव कमी होतो आणि रक्तदाब कमी होऊ लागतो.

-रक्तदाब बहुतेकदा अशा लोकांना होतो ज्यांचे वजन जास्त असते. अशा परिस्थितीत रक्तदाबाची समस्या टाळण्यासाठी दररोज व्यायाम करा.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पालक, केळी, दही आणि बदाम यासारख्या मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

किमान 15 मिनिटे नियमितपणे चाला.

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जंक फूड, अल्कोहोल (Alcohol) आणि तंबाखूचे सेवन टाळावे.

नॅशनल हेल्थ (Health) सर्व्हिस (NHS) नुसार, जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा धोका असेल, तर त्यांनी नियमितपणे रक्तदाब तपासला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT