Healthy Tips: पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही एक गंभीर समस्या आहे. जी महिलांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे त्रास देते. यामुळे पीरियड सायकलमध्ये अडथळे येणे, ओव्हुलेशन नीट न झाल्यामुळे गर्भधारणा न होणे, चेहऱ्यावर मुरुम आणि केसांचे आरोग्य आणि वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
इतकेच नाही तर त्यामुळे महिलांमध्ये मधुमेहाचा धोकाही वाढतो. PCOS चे मुख्य कारण खराब लाइफस्टाइल मानली जाते. लाइफस्टाइलमध्ये काही बदल करून ही समस्या टाळता येऊ शकते.
व्हिटॅमिन डी
पीसीओएसने ग्रस्त असलेल्या महिलांना सामान्यतः व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा त्रास होतो. यामुळे इन्सुलिन प्रतिरोधक आणि वजन वाढू शकते. पुरेसा सूर्यप्रकाश घेणे आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होते. तसेच प्रजनन क्षमता सुधारते. यामुळे टाइप 2 मधुमेह, हृदयविकार आणि स्ट्रोकची समस्या कमी होऊ शकतात.
व्यायाम करावा
Pपीसीओएसची समस्या कमी करण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्यासोबतच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे देखील खूप महत्वाचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान 150 मिनिटांचा व्यायाम तणावावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. यामुळे वजनही संतुलित राहते. व्यायामामुळे कॅलरी बर्न आणि इन्सुलिन नियंत्रित राहण्यास मदत होते.
पौष्टिक पदार्थ
पीसीओएस योग्य आहाराद्वारे नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. टोमॅटो, पालेभाज्या आणि ट्यूनासारखे फॅटी मासे, ट्री नट्स, ऑलिव्ह ऑईल यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा. याशिवाय प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेयांपासूनही दूर राहावे.
आहार योग्य ठेवावा
पीसीओएसने पीडित महिला त्यांच्या आहाराद्वारे ही समस्या नियंत्रित करू शकतात. तुम्ही तुमच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्य, शेंगा, काजू आणि बिया यांचा समावेश करू शकता. यामुळे इन्सुलिनची पातळी राखली जाते. तुमच्या आहारातील कार्बोहायड्रेट्स कमी करा आणि साखर, पांढरा ब्रेड, पांढरा भात इत्यादी शुद्ध कर्बोदकांपासून दूर रहावे. कारण यामुळे अनेक समस्या उद्भवतात.
ताण घेऊ नका
तणाव हे अनियमित मासिक पाळी येण्याचे सर्वात मोठे कारण मानले जाते. कामाच्या दबावामुळे आणि वैयक्तिक जीवनातील अनेक समस्यांमुळे तणाव अधिक वाढत आहे. त्यामुळे मानसिक आरोग्यावर दबाव येतो आणि त्यामुळे मासिक पाळी अनियंत्रित होऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.