Healthy Tips For Teenage: सध्या मुलींमध्ये स्लिम आणि फिट राहण्याचा ट्रेंड सुरू आहे. किशारवयीन मुली देखील आपले शरीर फिट ठेवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करत असतात. पण अनेक वेळा मेहनत करून देखीलवजन कमी होत नाही. लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा होण्याचा धोका वाढतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किशारवयीन मुलींनी पुढील टिप्स फॉलो केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आजार देखील दूर राहतील.
फळं खावी
अनेक किशोरवयीन मुली सकाळी घाईत शाळा किंवा क्लासला जातात तर खाण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकदा मुलींना पूर्ण पोषण मिळू शकत नाही. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, किशोरवयीन मुलींनी त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. फळांचा आहारत समावेश करावा. यामुळे दिवसभर त्यांना उत्साही वाटेल.
फॅट्सयुक्त पदार्थ
किशोरवयीन मुलींनी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फॅट्सयुक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करतात आणि महत्त्वपूर्ण हार्मोन्स तयार करण्यास देखील मदत करतात. पण लक्षात ठेवा की ट्रान्स फॅट अजिबात घेऊ नका.
रात्रीचे हलके जेवण
शरीर निरोगी ठेवण्यासाठी झोपण्याच्या 2 तास आधी जेवणे योग्य मानले जाते. तसेच, रात्रीच्या वेळी तुमच्या किशोरवयीन मुलीच्या आहारात डाळ, सूप आणि खिचडी यासारख्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पचन सुरळित होते आणि वजन देखील नियंत्रणात राहते.
हायड्रेशन
आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अन्नपदार्थांबरोबरच हायड्रेशनही खूप महत्त्वाचे आहे . शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेचे असते. पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते. यामुळे चयापचय चांगले राहते.
पोषक पदार्थ
निरोगी राहण्यासाठी किशोरवयीन मुलीच्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. या पदार्थांचे सेवन केल्याने शरीराचा विकास योग्य प्रकारे होईल आणि वजनही वाढणार नाही. कडधान्ये, धान्य, हिरव्या भाज्या, मासे यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. कॅल्शियमसाठी सोयाबीन, दूध आणि टोफूचे सेवन करावे. तसेच आजार टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी, लिंबू, द्राक्षे, बटाटे, टोमॅटो आणि संत्री यांचा आहारात समावेश करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.