Ajwain Water Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Tips: ओव्याचे पाणी औषधांप्रमाणे करते काम, दूर ठेवते अनेक आजार

ओव्याचे पाणी पिल्यास आरोग्यासह त्वचेलाही फायदा मिळतो.

Puja Bonkile

Ajwain Water Health Benefits: ओवा खाण्याबरोबरच ओव्याचे पाणी देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. नियमितपणे ओव्याचे पाणी पिल्यास शरीरासह त्वचेलाही फायदा मिळतो. ओव्याचे पाणी वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत अनेक आरोग्यदायी फायदे देते. ओव्यामध्ये कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जाणून घेऊया ओव्याचे पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत.

1) प्रतिकारशक्ती

ओव्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट , अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे पाणी प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. ओव्याचे पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक आजारांशी लढण्यास मदत मिळते.

2) खराब कोलेस्टेरॉल

ओव्याच्या पाण्यात फायबर आणि फॅटी ऍसिड असतात. हे पाणी प्यायल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. तसेच ओव्याचे पाणी खराब कोलेस्ट्रॉलही कमी करते.

3) संसर्ग

ओव्याच्या पाण्यात जंतुनाशक गुणधर्म असतात. बदलत्या हवामानात आरोग्यासंबंधी आजार निर्माण होतात. ओव्याचे पाणी पिऊन तुम्ही हंगामी संसर्गापासूनही दूर राहू शकता.

Ajwain

4) सुरळित पचन

ओव्यामध्ये फायबरचे मुबलक प्रमाण असते. ओव्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळित कार्य करते. पोटासंबंधित आजार आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवते. ब

5) वजन कमी

सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्याने पचन होण्यास मदत मिळते. तसेच फॅट बर्न करण्यासाठी देखील काम करते. हे पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यासही मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

6) रक्तातील साखर

ओव्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ओव्यामध्ये फायबर असते. ओव्याचे पाणी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT