Astro Tips For Mata Lakshmi: ज्योतिषशास्त्रात स्वच्छतेबाबत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. घरात केलेल्या कामाचा संबंध माणसाच्या नशिबाशी जोडला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार अनेक दैनंदिन गोष्टी सांगितल्या आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यासघरात गरिबी येऊ शकते. स्वच्छतेबाबत काही नियम सांगितलेले आहेत. ज्याचे पालन करणे गरजेचे आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी घरातझाडू लावणे किंवा कचरा बाहेर टाकणे अशुभ मानले जाते. सूर्यास्तानंतर झाडू लावल्यास माता लक्ष्मी नाराज होते. परंतु कधीकधी काही कारणास्तव तुम्ही संध्याकाळी झाडू लावत असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार कचरा घराबाहेर जावू देऊ नका. कचरा एका ठिकाणी जमा करावा दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर फेकावा. असे मानले जाते की संध्याकाळी घराबाहेर कचरा टाकल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघुण जाते. यामुळे घरात गरिबी येते.
झाडू कधी खरेदी करावा
ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये जुना झाडू वापरू नये. नविन झाडू घ्यायला असेल तर शनिवारी खरेदी करावा. तसेच या दिवशी नवा झाडू वापरणे शुभ मानले जाते. तसे तर कृष्ण पक्षात झाडू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.