Healthy Relationship Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Relationship: फिट राहण्यासाठी दोघांनाही फॉलो कराव्या 'या' खास टिप्स

Healthy Relationship: नातं तयार करणं जितकं कठीण तितकंच ते टिकवणंही कठीण. नातं टिकवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टीसाठी तडजोड करावी लागते. याशिवाय एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील गरजेचे असते.

Puja Bonkile

Healthy Relationship: कोणतेही नातं परफेक्ट नसते, परंतु नात्यातील काही गोष्टींमध्ये सामंजस्य निर्माण केल्यास नातं फुलतं. यातील काही गोष्टींमध्ये एकमेकांचा आदर करणे, एकमेकांच्या आवडी-निवडीची काळजी घेणे, एकमेकांशी बोलून सर्व प्रकारचे अनुभव शेअर करणे आणि सर्व मतभेद दूर करणे यांचा समावेश होतो.

असे केल्याने नातंसंबंध नेहमीच आनंदी राहते. परंतु कपल्स आनंदी आणि निरोगी राहिले तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी, आपण स्वतःची तसेच एकमेकांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. एकमेकांच्या आहाराकडे आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे दोघेही निरोगी आणि आनंदी राहू शकतील.

  • वयानुसार एकमेकांना आपल्या शरीरावर प्रेम करण्यास प्रोत्साहित करावे. नात्यातील ठराविक काळानंतर शरीरही जुळवून घेऊ लागते. अशावेळी वाढत्या वयामुळे तुम्ही स्वतः निराश होणार नाही किंवा तुमचा जोडीदारही निराश होणार नाही याची काळजी घ्यावी. जोडीदाराचे कौतुक करावे, त्यांना त्यांच्या शरीरावर प्रेम करण्यास प्रवृत्त करत रहा.

  • फिट राहणे एकमेकांसाठी गरजेचे आहे. रोज योगा करूनही फळ मिळत नसेल, तर दुःखी होऊ नका. कारण अन्यथा तुमच्यापैकी एक आजारी पडला तर तो दुसऱ्यावर अवलंबून होईल.

  • फिटनेससाठी जोडीदारावर दबाव आणू नका. त्यांच्यासाठी एक उदाहरण ठेवा आणि त्यांना प्रेरणा द्या. जर तुमचा जोडीदार फिटनेसबाबत गंभीर नसेल, तर काही हरकत नाही, त्याच्यासमोर फिटनेसचे फायदे आणि उदाहरणे सादर करा. काही काळानंतर, हळूहळू तुमच्या जोडीदाराला प्रेरणा मिळेल आणि तो फिटनेसचा मार्ग अवलंबण्यास सुरुवात करेल.

  • तंदुरुस्त राहणे ही तुमच्या जोडीदाराप्रती तुमची जबाबदारी आहे. तुम्ही स्वत: फिट राहिल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारावर कधीही ओझे बनणार नाही.अशाप्रकारे, तुम्ही त्यांच्याप्रती तुमची मोठी जबाबदारीही पार पाडाल, ज्यामुळे तुम्हा दोघांनाही फायदा होईल.

  • तुमचा पार्टनर फिटनेस कॉन्शस आहे, पण तुम्ही नसाल तर तुमच्या पार्टनरला सपोर्ट करा. फिट असणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या फिट जोडीदाराकडून प्रेरणा घ्या आणि त्याकडे तुमचा कल वाढवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT