Healthy Kidney Tips: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Kidney Tips: 'या' सवयींमुळे किडनी होऊ शकते निकामी, रूटीनमध्ये करा बदल

किडनी हा शरीरातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे ती निकामी झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Puja Bonkile

Healthy Kidney Tips: किडनी शरीरातील घाण बाहेर काढण्याचे काम करते. यामुळे शरीर निरोगी राहते. किडनी निकामी झाल्यास व्यक्तीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. किडनी निरोगी असेल तर आरोग्य देखील निरोगी राहते. पण किडनी का खराब असेल तर अनेक आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होतात. तुमच्या आरोग्यासोबतच तुम्ही किडनीची देखील काळजी घेतली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे.

  • हायड्रेटेड रहा


किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. त्याच्या निरोगी आरोग्यासाठी पाणी पिणे देखील खूप महत्वाचे आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी व्यवस्थित काम करण्यास मदत होते. यामुळे शरीराला हायड्रेट ठेवणे देखील गरजेचे असते.

  • वजन नियंत्रणात ठेवा

वजन वाढले की किडनीवर ताण पडतो. त्यामुळे किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे किडनीचेही नुकसान होऊ शकते. किडनीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपले वजन नेहमी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

  • कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन टाळावे

कॅफिन आणि अल्कोहोलचे जास्त सेवन केल्याने मूत्रपिंड खराब होऊ शकते. किडनीची काळजी घेण्यासाठी दारू, सिगारेट इत्यादीपासून दूर राहावे. त्यामुळे किडनी निकामीही होऊ शकते.

  • व्यायाम करा


उत्तम आरोग्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. व्यायामाने किडनीही चांगली राहते. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी योगासनेही केली पाहिजेत. भुजंगासन, बालासन आणि पवनमुक्तासन करावे. व्यायामामुळे किडनीची कार्यक्षमता वाढते.

  • योग्य आहार

किडनीच्या आरोग्यासाठी आहाराची काळजी घ्यावी. यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे. तसेच सफरचंद, लिंबूवर्गीय फळे आणि काळे इत्यादींचा आहारात समावेश करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT