Healthy juice for diabetics ppb94 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

मधुमेह असणाऱ्यांसाठी आरोग्यदायी ज्यूस

मधुमेह असणाऱ्या लोकांनी हा उपाय नक्की करून पहा.

दैनिक गोमन्तक

आजकाल धावपळीच्या काळात मधुमेह हा आजार अनेक लोकांना होतो. या आजारवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास आरोग्यास (Health) धोका निर्माण होऊ शकतो. मधुमेह (Diabetes) असणाऱ्या लोकांनी गोड पदार्थ खाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. पण आज तुम्हाला आम्ही असे काही पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करता येईल.

* कारल्याचा ज्यूस

कारले मधुमेह आजारावर रामबाण उपाय ठरतो. कारल्याचे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करू शकता. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ग्रुप, थायमिन आणि रिबोफ्लेविन यासारखे विविध पोषक घटक असतात. यामुळे तुम्ही जर नियमितपणे उपाशी पोटी कारल्याचा ज्यूस घेतला तर मधुमेह नियंत्रित करता येतो.

* टोमॅटो ज्यूस

आपण टोमॅटोचे सेवन नियमितपणे करतो. हे आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट असतात यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मदत मिळते. यामुळे टोमॅटोचा ज्यूस घेतल्यास मधुमेह नियंत्रित राहते.

* काकडीचा ज्यूस

काकडीमध्ये भरपूर पाणी आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. काकडीचा वापर सॅलडमध्ये केला जातो. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी काकडीचे सेवन करतात. पण तुम्हाला महिती आहे का, काकडीच्या ज्यूसचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रित राहतो.

* फुले आणि पाने

मादागास्कर किंवा सदाहरित वनस्पती प्रत्येक घरात शोभा वाढवण्यासाठी लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का की मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर ठरू शकते. या वनस्पतीच्या पानांमध्ये अल्कलॉइड्स नावाचा घटक असतो, ज्यामुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशीचे कार्य सुरळीत चालते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT