Digestion ची समस्या दूर करण्यासाठी 'या' 4 टिप्स करा फॉलो

पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी नेहमी ताजे आणि सकस अन्न घ्यावे .
Follow these 4 things to get rid of digestion
Follow these 4 things to get rid of digestion Dainik Gomantak
Published on
Updated on

निरोगी आरोग्यासाठी (Healthy) पचन संस्था चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोक फक्त पोट भरण्यासाठी अन्न खातात. यामुळे त्यांना पोटासंबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. ओटीपोटात दुखणे, आंबाटपणा, गॅस, मळमळ, बद्धकोष्ठता आणि अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला सुद्धा या समस्या असतील तर या टिप्स नक्की फॉलो करा.

* ताजे अन्न खावे

निरोगी आरोग्यासाठी नेहमी ताजे आणि शिजवलेले अन्न खावे. ताजे अन्न लवकर पचण्यास मदत होते. अनेक वेळा लोक फ्रीजमधून बाहेर काढून लगेच खातात. यामुळे पोटाच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

* भूक लागल्यावर अन्न खावे

भूक लागल्ल्यावरच जेवण करावे. अनेक डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला भूक लागत नसेल तर अनावश्यकपणे कधीही खाऊ नका. आपल्या खाण्यापिण्याच्या योग्य वेळापत्रक बनवावे. वेळापत्रक बनवल्याने तुम्हाला योग्य वेळी भूक लागेल. यासह आपल्या पआहारामध्ये हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. तसेच मौसमी फळांचा आहारात समावेश करावा.

Follow these 4 things to get rid of digestion
Breakfast: Coconut Smoothie चा घ्या आस्वाद

* जेवण करतांना योग्य पद्धतीने खावे

अनेक वेळा आपण जेवण घाईघाईमध्ये करतो. यामुळे अन्न पचण्यास बराच वेळ लागतो. पचन संस्थाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी अन्न व्यवस्थित चघळावे आणि मगच गिळावे. असे केल्यास अन्न पटकन आणि सहज पचते.

* भरपूर पाणी प्यावे

निरोगी आरोग्यासाठी व्यक्तीने दिवसातून किमान 4 ते 5 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन सोबतच तुम्हाला बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि किडनी स्टोन सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही दिवशभर पाण्याशिवाय ज्यूसचे देखील सेवन करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com