Energy Food: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Foods For Boost Energy: ऑफिसमध्ये कामामुळे जेवायला वेळ मिळत नाहीयं, मग 'या' पदार्थांनी दूर ठेवा थकवा

Foods For Boost Energy: काही अन्नपदार्थ आपल्या शरीराला ऊर्जी देण्याचे काम करते.ऑफिसमध्ये कामामुळे जेवणासाठी वेळ नसेल तर तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन करू शकता.

Puja Bonkile

Foods For Boost Energy: ऑफिसमधील कामाच्या धावपळी दरम्यान अनेकवेळा खाण्याकडे लक्ष देत नाही. कधी नाश्ता तर कधी दुपारचे जेवण टाळतो. असे करणे तुमच्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते. ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवतो.

शरीर हे एका वाहनासारखे आहे आणि त्याला सामान्य वाहनांप्रमाणे चालण्यासाठी इंधनाची देखील आवश्यकता असते. त्यामुळे सकस आणि संतुलित आहार घेणे आणि योग्य वेळी खाण्याची सवय तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते. आज आपण अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला झटपट ऊर्जा देतात. जर तुम्हाला कामाच्या दरम्यान जेवायला वेळ मिळत नसेल तर या गोष्टी खाऊन तुम्ही अशक्तपणा आणि थकवा या समस्या दूर ठेऊ शकता.

केळी

केळी जीवनसत्त्वे, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबरचा उत्तम स्रोत मानला जातो. याशिवाय त्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मही असतात. केळी हे पूर्ण अन्न मानले जाते. दोन ते तीन केळी खाल्ल्याने पोट तर भरतेच पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जाही मिळते.

सफरचंद

सफरचंद खाणे आरोग्यदायी असते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. दिवसाला एक सफरचंद खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.

मनुका

सुक्या मेव्यामध्ये हेल्दी फॅट्स आढळतात. जर तुम्ही हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स कमी प्रमाणात खावे. थकवा दूर करण्यास मनुका मदत करते. तुम्ही मनुका जसे आहे तसे किंवा दुधात उकळून पिऊ शकता. लोहयुक्त मनुका रक्ताची कमतरता भरून काढतात.

तुळस

पुरेशी झोप घेऊनही दिवसभर थकवा जाणवत असेल आणि त्यामुळे काम करावंसं वाटत नसेल, तर तुळशीच्या पानं खावे. तुळशीची पानं चहा किंवा पाण्यात उकळून प्यायल्याने अशक्तपणा, थकवा दूर होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

डाळिंब

थकवा दूर करण्यासाठी डाळिंब देखील खाऊ शकता. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. यामुळे डाळिंबाचे सेवन नियमितपणे करावे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

Budh Chandra Yuti: 2026 च्या सुरुवातीलाच 'बुध-चंद्र' युतीचा धमाका! धनु राशीत राजकुमार आणि मनाचा कारक एकत्र; 'या' 3 राशींच्या लोकांचे पालटणार नशीब

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वर्का येथील प्रकाराने खळबळ

SCROLL FOR NEXT