Matar Cheela Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Matar Cheela Recipe: वीकेंडला घ्या गरमागरम मटार चीलाचा आस्वाद, मिळेल टेस्टचा डबल डोस

Healthy Breakfast Recipe: मटारच्या चिल्याची चव सर्वात खास आणि वेगळी आहे.

दैनिक गोमन्तक

Matar Cheela Recipe: तुम्ही वीकेंड खास बनवण्यासाठी अनेक नवनवे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असतात. हिवाळा सुरू झाला की घरातील स्त्रिया हेल्दी आणि झटपट बनणारे पदार्थ बनवतात. मटार चीला हा असाच एक पदार्थ आहे. आजपर्यंत तुम्ही विविध डाळी, बेसन यांसारख्या गोष्टींपासून बनवलेल्या अनेक प्रकारचे चीले खाल्ले असतील. पण वाटाणा चीलाची चव सर्वात खास आणि वेगळी आहे. हा चीला बनवायला खूप सोपा तर आहेच पण चविष्ट देखील आहे.

  • मटार चीला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- 250 ग्रॅम वाटाणे

- 1 टीस्पून बारिक चिरलेले आलं

- 2 टेबलस्पून कोथिंबीर

- 2 हिरवी मिरची

- 2 टोमॅटो

- 1 कांदा

- 250 ग्रॅम रवा

- चवीनुसार मीठ

- आवश्यतेनुसार तेल

  • मटार चीला कसे बनवावे

वाटाण्याचा चीला बनवण्यासाठी सर्वात पहिले वाटाणा पाण्याने स्वच्छ धुवा.

यानंतर एका प्लेटमध्ये कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

आता वाटाणा सोबत हिरवी मिरची आणि आले बारीक करून घ्या.

ही पेस्ट एका भांड्यात ठेवा आणि त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, जिरे, रवा आणि चवीनुसार मीठ घाला.

नीट मिक्स करा आणि हे मिश्रण 10 मिनिटे झाकून ठेवा.

आता चीला बनवण्यासाठी नॉनस्टिक तवा किंवा पॅन मध्ये आचेवर गरम करा.

आता त्यावर थोडे तेल घाला.

आता तयार केलेल्या वाटाण्याचे मिश्रण तव्यावार टाका आणि डोसासारखे पसरवा.

शिजल्यानंतर चीला उलटा करा आणि नंतर दुसऱ्या बाजूने देखील शिजवा.

दोन्ही बाजूंनी चीला शिजल्यानंतर काढून प्लेटमध्ये ठेवा आणि चटणीबरोबर सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT